जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्रात आता मिळणार 5G कनेक्टिविटी, या कंपनीने इंस्टॉल केला पहिला मोबाइल टॉवर
आपल्या देशातील बहुतांश भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सहज उपलब्ध आहे. प्रत्येक भागात दुरसंचार कंपन्यांनी त्यांचे नेटवर्क टॉवर स्थापित केले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन युजर्स अगदी सहज इंटरनेटचा वापर करू शकतात. दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्क टॉवरमुळे स्मार्टफोन युजर्स त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी सहजपणे बोलू शकतात आणि इंटरनेटचा वापर करू शकतात. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही अगदी कोणतेही काम करू शकता. म्हणजेच अगदी मित्र – मैत्रिणींना मॅसेज करण्यापासून ते व्हिडीओ पाहण्यापर्यंत सर्व कामांसाठी इंटरनेटची गरज असते.
OnePlus Offer: OnePlus 13 सीरीजसोबत कंपनी देतेय फ्री रिप्लेसमेंट ऑफर, पण ही अट लक्षात ठेवा
पण अजूनही असे अनेक भाग आहेत, जिथे इंटरनेटची सुविधा नाही. मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. विशषेत: उंच भागांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या प्रचंड आहे. मात्र आता भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी जिओने अशा भागांत देखील आपले टॉवर बसवण्यास सुरुवात केली आहे, जिथे नटवर्कची प्रचंड समस्या आहे. जिओने सियाचीन ग्लेशियरमध्ये आपला पहिला 5G नेटवर्क मोबाइल टॉवर लावला आहे. (फोटो सौजन्य – X)
सियाचीन ग्लेशियर हा जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्राचा भाग आहे. जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये अनेक अडचणी येतात. मात्र आता जिओने या भागात पहिला 5G नेटवर्क मोबाइल टॉवर लावला आहे. ज्यामुळे येथील तैनात सैनिक 5G नेटवर्कचा वापर करू शकतील. जिओने इंस्टॉल केलेल्या या टॉवरमुळे येथील तैनात सैनिक त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी सहजपणे बोलू शकतात आणि इंटरनेटच्या मदतीने त्यांना व्हिडिओ कॉल करू शकतात. आता सियाचीन ग्लेशियरवर तैनात असलेले सैनिकही हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील आणि त्यांच्या कुटुंबीयांशी आणि मित्रमंडळींशी सहज बोलू शकतील.
शहरांमध्ये इंटरनेट सहज उपलब्ध आहे. परंतु, अजूनही काही दुर्गम भागात इंटरनेटच्या समस्या आहेत. सियाचीन ग्लेशियर देखील यापैकी एक आहे. येथे तैनात असलेल्या सैनिकांना इंटरनेट वापरण्यात अडचण येत होती. पण, आता असे होणार नाही. आता सियाचीनमध्ये तैनात सैनिकांनाही हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. कारण जिओने या भागांत आपला पहिला 5G नेटवर्क मोबाइल टॉवर लावला आहे.
आजच्या काळात इंटरनेट ही प्रत्येकाची गरज बनली आहे. शहरी भागात चांगला स्पीड इंटरनेट सहज उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने लोक त्यांचे महत्त्वाचे काम सहज करू शकतात. तुम्हाला व्हिडिओ कॉलवर मित्र किंवा कुटुंबीयांशी बोलायचे असेल, ऑफिसचे काम करायचे असेल, तुमचा मोबाईल रिचार्ज करायचा असेल, ऑनलाइन कंटेंट पाहायचा असेल, प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
Moto g05 ची पहिली सेल लाईव्ह, 50MP कॅमेरा आणि 5200 mAh बॅटरीने सुसज्ज! किंमत केवळ एवढी
सियाचीन ग्लेशियर हे देशातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. येथील तापमान मायनसमध्ये आहे. येथे जोरदार बर्फवृष्टी देखील होते. कडाक्याच्या थंडीत सियाचीन ग्लेशियरवर उभे राहणेही कठीण झाले आहे. येथे तैनात असलेल्या सैनिकांना इंटरनेट वापरण्यात अडचणी आल्या. पण, आता सैनिकांनाही इंटरनेटचा सहज वापर करता येणार आहे.