Moto g05 ची पहिली सेल लाईव्ह, 50MP कॅमेरा आणि 5200 mAh बॅटरीने सुसज्ज! किंमत केवळ एवढी
स्मार्टफोन कंपनी Motorola ने नुकताच भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto g05 नावाने हा नवीनतम स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 90 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा मोठा डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये अनेक युनिक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या नवीनतम स्मार्टफोनची पहिली सेल आज 13 जानेवारी 2025 पासून ई कॉमर्स फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे.
तुम्ही Motorola चा हा नवीनतम स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे जे युजर्स कमी किंमतीत चांगल्या फीचर्सवाला फोन शोधत असतील त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ठरू शकतो. स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, त्याची किंमत काय आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Motorola च्या नवीनतम स्मार्टफोन Moto g05 ची पहिली सेल आजपासून फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे. हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि प्लम रेड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 6,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. सेलमध्ये फोन खरेदी केल्यास, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. त्यामुळे हा बजेट स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
प्रोसेसर – Motorola ने लाँच केलेल्या या बजेट स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी कंपनीने MediaTek Helio G81-Ultra प्रोसेसर बसवला आहे. हे 4 जीबी रॅम आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅमसह जोडलेले आहे. फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आकार 6.67 इंच आहे. मोटोरोलाचा हा पहिला फोन आहे, जो सेगमेंटमध्ये Android 15 वर काम करतो. यात दोन वर्षांचे अपडेट्सही आहेत. फोनला कॉर्निंग गोरिला ग्लास 3 संरक्षण देण्यात आलं आहे. नवीन स्मार्टफोन 4GB LPDDR4X रॅम, 64GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
बॅटरी – नवीनतम स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Moto g05 मध्ये 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5200mAh बॅटरी आहे. फोनला IP52 ची धूळ आणि स्प्लॅश रेटिंग आहे. यामध्ये कंपनीने बॅटरीच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. या सेगमेंटमधील बहुतेक फोन 5000 mAh बॅटरीसह येतात.
कॅमेरा – फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. वापरकर्ते 8MP कॅमेरासह सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करू शकतात. तुम्ही नवीन फोन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Motorola चा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला कमी किंमतीत अगदी कमालीचे फीचर्स मिळणार आहेत.