OnePlus Offer: OnePlus 13 सीरीजसोबत कंपनी देतेय फ्री रिप्लेसमेंट ऑफर, पण ही अट लक्षात ठेवा
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी OnePlus ने काही दिवसांपूर्वीच म्हणजे 7 जानेवारी रोजी एका इव्हेंटमध्ये OnePlus 13 आणि OnePlus 13R हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. स्मार्टफोन गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होते, त्यामुळे स्मार्टफोनच्या लॉचिंगची आणि फर्स्ट सेलची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते. OnePlus 13 सीरिजमधील हे फोन 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहेत.
Tech Tips: तासंतास स्मार्टफोन वापरण्याच्या सवयीमुळे हैराण झालात? या टीप्स करतील तुम्हाला मदत
नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगनंतर आता कंपनीने भारतात OnePlus 13 सीरिजसह एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे 180-दिवसांचा फ्री रिप्लेसमेंट प्लॅन. या कार्यक्रमांतर्गत, खरेदीदारांना 180 दिवसांच्या आत हार्डवेअरशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास फोन बदलण्याची सुविधा मिळेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
OnePlus च्या या प्रोग्राम अंतर्गत, फोनमध्ये 180 दिवसांच्या आत म्हणजेच सुमारे सहा महिन्यांत कोणतीही हार्डवेअर समस्या उद्भवल्यास, OnePlus 13 वापरकर्ते त्यांचे डिव्हाइस एकदा बदलू शकतील. यावेळी यूजर्सना नवीन फोन दिला जाईल जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. कंपनीने सुरू केलेली ही ऑफर यूजर्ससाठी प्रचंड फायद्याची ठरणार आहे. स्क्रीन, बॅक कव्हर, बॅटरी मदरबोर्ड इत्यादी सर्व डिव्हाईस पार्ट या प्लॅनमध्ये समाविष्ट केले जातील. या प्रोग्रामचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
OnePlus इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनी सांगितलं की, आम्ही OnePlus 13 सीरिजसाठी प्रोटेक्शन प्लॅन ऑफर करणार आहोत. आम्हाला या प्लॅनवर प्रचंड गर्व आहे. यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. OnePlus 13 सीरिजसाठी 180-दिवसांची फ्री रिप्लेसमेंट ऑफर आमच्या प्रोडक्ट्सची विश्वसनीयता आणि वापरकर्त्यासाठी आमची काळजी प्रतिबिंबित करते.
10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान OnePlus 13 सीरिज खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना ही सेवा मोफत मिळेल. या कालावधीनंतर, वापरकर्त्यांना या सेवेसाठी पेड प्रोटेक्शन प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. या प्लॅनसाठी OnePlus 13 ची किंमत 2,599 रुपये आणि OnePlus 13R ची किंमत 2,299 रुपये असेल. मात्र तुम्हाला फ्री रिप्लेसमेंट प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल तर 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे.
कंपनीने सुरू केलेला हा प्रोग्राम वनप्लसच्या प्रोजेक्ट स्टारलाइटचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांना जलद समर्थन, चांगली पारदर्शकता आणि अधिक सोयीस्कर सेवा प्रदान करणे आहे.
OnePlus 13 मध्ये LTPO 4.1, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits च्या पीक ब्राइटनेससह 6.82-इंचाचा ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की डिस्प्ले 100% डिस्प्ले P3, 10-बिट कलर डेप्थला सपोर्ट करतो आणि सिरेमिक गार्ड कव्हर ग्लासद्वारे संरक्षित आहे. OnePlus 13 Qualcomm च्या नवीनतम फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Elite द्वारे समर्थित आहे. हे Adreno 830 GPU आणि 24GB पर्यंत LPDDR5X RAM सह जोडलेले आहे. फोन 1TB UFS 4.0 स्टोरेजसह येतो.
खुशखबर! ही कंपनी ऑफर करतेय अनलिमिटेड इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळणार! काय आहे ऑफर?
OnePlus 13 पाचव्या पिढीच्या हॅसलब्लॅड ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये OIS (1/1.4-इंच) आणि ALC लेन्स कोटिंगसह 50MP Sony LYT-808 प्रायमरी सेन्सर आहे. दुसरा 50MP Samsung ISOCELL GN5 सेन्सर (1/2.75-इंच) अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह येतो. तिसरा कॅमेरा सोनीच्या 50MP LYT-600 सेन्सरला टेलिफोटो लेन्ससह एकत्रित करतो जो 3X ऑप्टिकल झूम ऑफर करतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP Sony IMX615 सेन्सर देण्यात आला आहे. OnePlus 13 मध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध आहे.