QR Code Scam: या QR Code स्कॅमबद्दल माहिती आहे का? तुमची एक चूक आणि हॅकर्सकडे पोहोचतील डिटेल्स
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने आपले जीवन अगदी सोपे केले असले तरी त्याच्याशी निगडित धोके दुर्लक्षित करता येणार नाहीत. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञान आपले जीवन सोपे करत असताना सायबर गुन्हेगार फसवणुकीचे माध्यम बनवत आहेत. यामुळे सामान्य लोकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सध्या “QR कोड स्कॅम” किंवा “Quishing” च्या अनेक घटना समोर येत आहेत. QR कोड स्कॅमच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरतात. अशा अनेक घटना सध्या समोर आल्या आहेत. त्यामुळे या स्कॅमबद्दल प्रत्येकाने जागरूक राहणं गरजेचं आहे. शिवाय या स्कॅमपासून आपली सुरक्षा कशी करावी, याबद्दल देखील प्रत्येकाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
क्विशिंग ही एक पद्धत आहे ज्यामध्ये सायबर गुन्हेगार बनावट QR कोड वापरतात. लोक हे QR कोड स्कॅन करतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग तपशील चोरण्यासाठी डिझाइन केलेल्या वेबसाइटवर पोहोचतात. क्विशिंगचा वापर करून सायबर गुन्हेगार लोकांची माहिती चोरतात आणि त्यांची फसवूणक करतात.
बनावट वेबसाइट्स: गुन्हेगार लोकांना QR कोड स्कॅन करण्यास सांगून बनावट वेबसाइट्सवर घेऊन जातात.
धोकादायक सॉफ्टवेअरचा वापर: काही QR कोडमध्ये असे सॉफ्टवेअर असते जे फोनची माहिती चोरू शकतात.
UPI पिनची मागणी: या वेबसाइट अनेकदा वैयक्तिक माहिती आणि UPI पिन मागतात.
क्विशिंगशिवाय QR कोडशी संबंधित दुसरा घोटाळा म्हणजेच QR कोड बदलणं. हा घोटाळा दुकानदारांशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वीच अशी एक घटना घडली होती, ज्यामध्ये गुन्हेगारांनी दुकांनावरील मूळ QR कोड काढला होता आणि तो त्यांच्या स्वतःच्या QR कोडने बदलला होता, ज्यामुळे सर्व पेमेंट त्यांच्या खात्यात जात होते. रात्रीच्या वेळी दुकाने आणि पेट्रोल पंप यांसारख्या ठिकाणी घोटाळेबाज क्यूआर कोड बदलत होते. अशा परिस्थितीत दुकांनदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Tech Tips: Instagram वर ब्लू टिक मिळवणं आता अगदी सोपं! 6 स्टेप्समध्ये व्हेरिफाईड होईल तुमचं अकाऊंट