TRAI New Rule: टेलिकॉम कंपन्यांना ट्रायचा दिलासा, या दिवशी लागू होणार नवीन ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स
1 डिसेंबरपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (TRAI) नवीन नियम लागू केले जाणार होते. मात्र टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या मागणीमुळे आता ट्रायने ट्रेसिबिलिटी लागू करण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे. ट्रायच्या नवीन ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स आता 10 डिसेंबरपासून लागू केल्या जाणार असल्याचं समोर आलं आहे. ट्रायने हे नवीन नियम लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी ट्रायने सांगितलं होतं की हे नविन नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू केले जाणार होते. मात्र टेलिकॉम कंपन्यांच्या मागणीमुळे हे नियम 1 ऑक्टोबारपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर ट्रायने पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांना दिलासा देत नियम लागू करण्याची तारीख 1 नोव्हेंबर केली होती. ट्रायने जारी केलेल्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना 1 नोव्हेंबरपासून ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स लागू करायच्या होत्या.
मात्र कंपन्यांनी पुन्हा एकदा ट्रायकडे मुदत वाढ करण्याची मागणी केली. यानंतर ट्रायने 1 डिसेंबरपासून ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता ही मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स 10 डिसेंबरपासून लागू केल्या जाणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार कंपन्यांना संदेश ट्रेसिबिलिटी लागू करण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे. हा नियम आता 10 डिसेंबरपासून लागू होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना दिलासा देताना ट्रायने म्हटले आहे की, 11 डिसेंबरपासून स्पॅम कॉल्स आणि मेसेज कोणत्याही परिस्थितीत ब्लॉक करावे लागतील. आता ट्रायने OTP आधारित मॅसेज पडताळणीसाठी कंपन्यांना 10 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.
दूरसंचार प्लॅटफॉर्मचा वापर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांसारख्या क्रियाकलापांसाठी होणार नाही याची खात्री करण्यासाठी ट्राय ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स लागू करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून होणार होती. कंपनीने 10 दिवसांचा वेळ दिला असून 10 डिसेंबरपासून मेसेज ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स लागू करण्यास कंपन्यांना सांगितले आहे. ट्रायने सांगितले की, कम्युनिकेशन चेनमध्ये 27 हजारांहून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा टेलिमार्केटरना दूरसंचार कंपन्या अलर्ट देत आहेत.
टेलिकॉम कंपन्यांच्या अपूर्ण तयारीमुळे ट्रायने दहा दिवसांचा अवधी दिला आहे. यापूर्वी मेसेज ट्रेसिबिलिटी नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार होता. ट्रायने सांगितंल आहे की, टेलीमार्केटर किंवा व्यावसायिक संदेश आणि कॉल करणाऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय ते संदेश पाठवू किंवा कॉल करू शकणार नाहीत.
ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स अंतर्गत, टेलिकॉम कंपन्यांना बँक, ई-कॉमर्स आणि इतर संस्थांकडून येणारे असे सर्व संदेश ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात टेलीमार्केटिंग किंवा प्रमोशनल सामग्री आहे. यासोबतच त्यांनी कंपन्यांना अशी सिस्टम तयार करण्यास सांगितले आहे जेणेकरुन ग्राहकांना आलेले संदेश सहज ट्रेस करता येतील.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यासोबतच ट्रायचे म्हणणे आहे की त्यांनी टेलीमार्केटिंग आणि प्रमोशनल मॅसेजसाठी फॉरमॅटही ठरवले आहे, जेणेकरून यूजर्स ते सहज ओळखू शकतील. हे पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकांना सहज कळेल की त्यांना संदेश कोठून मिळत आहेत. असे केल्याने टेलिकॉम प्लॅटफॉर्मवर होणारी फसवणूक कमी होण्यास मदत होऊ शकते.