VI युजर्ससाठी गुड न्यूज! स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून आता मिळणार सुटका, AI करणार मदत
स्मार्टफोम युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पॅम कॉल्स आणि मॅसेज. स्पॅम कॉल्स आणि मॅसेजमुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. यामुळे फसवणुकीच्या अनेक घटना देखील घडत आहेत. स्मार्टफोन युजर्सच्या या समस्या लक्षात घेऊन आता टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी नवीन अपडेट लाँच करत आहे. यामुळे स्मार्टफोन युजर्सची स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून सुटका होणार आहे. काही दिवसांपूर्वी जिओने सांगितलं की त्यांचे युजर्स MyJio ॲप वापरून स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून सुटका मिळवू शकतात.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आता टेलिकॉम कंपनी व्हिआयने देखील त्यांच्या युजर्सना स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून सुटका मिळावी यासाठी एआयची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. VI ने युजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन एक नवीन ‘AI-पावर्ड स्पॅम मॅनेजमेंट सॉल्यूशन’ लाँच केले आहे. याच्या मदतीने आता युजर्सची स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून सुटका होणार आहे. नवीन अॅडवांस सॉल्यूशन फ्लॅग पॉटेंशियल स्पॅम मॅसेजना रियल टाइममध्ये एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने फ्लॅग करते आणि ब्लॉक करते. (फोटो सौजन्य – pinterest)
युजर्सचे फसवणूक आणि अनवाँटेड कंटेंटपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने कंपनीने हे सॉल्यूशन लाँच केले आहे. अहवालानुसार, नवीन अॅडवांस सॉल्यूशनने 24 मिलियनहून अधिक स्पॅम मॅसेजना फ्लॅग केले आहे. नवीन सिस्टीम गरजेचे नसलेले मॅसेज इंस्टेंटली स्पॉट करते.
नवीन “स्पॅम डिटेक्शन सोल्यूशन” AI अल्गोरिदमच्या मदतीने VI च्या पायाभूत सुविधा आणि स्क्रीन इनकमिंग मॅसेजमध्ये आपोआप इंटीग्रेट होईल. या एआय अल्गोरिदमची लाखो संदेशांवर चाचणी केली गेली आहे. नवीन सिस्टम फ्रॉड लिंक्स, अनऑथराइज्ड प्रमोशन आणि फिशिंगशी संबंधित प्रकरणे रिअल टाइममध्ये ट्रॅक करते.
नवीन सिस्टम एआय अल्गोरिदमद्वारे सतत येणारे संदेश स्कॅन करते. ते संदेशाचे नमुने देखील तपासते आणि फिशिंग लिंक्स येण्यापूर्वी ब्लॉक करते. संदेश येण्यापूर्वी सिस्टमला स्पॅम म्हणून काहीही आढळल्यास, ते स्वतंत्रपणे मार्क करते.
नवीन सोल्युशन सुरक्षा वाढवते आणि वापरकर्त्यांना फसवणुकीपासून सुरक्षित ठेवते. या नवीन सोल्युशनमुळे, वापरकर्त्यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा चांगली होईल. याशिवाय, कंपनी अशा सोल्युशनवर देखील काम करत आहे ज्यामध्ये फसवे व्हॉईस कॉल शोधण्यासाठी एक नवीन फीचर असेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीने मोबाईल ॲपद्वारे ऑटोमॅटिक स्पॅम कंपलेट फाइलिंग सर्विस देखील सुरू केली आहे. याद्वारे फसवणूक वगैरेची तक्रार ॲपवरूनच करता येते. यामध्ये सेंडरचा नंबर, तारीख आणि स्पॅम यांसारख्या गोष्टींवर नजर ठेवली जाते. अनसोलिटेड कमर्शिअल कम्युनिकेशन्स (UCC) डिटेक्शन सिस्टीमला प्रतिबंध करण्यासाठी ते प्रीवेंट डेटा देखील वापरते.