मोबाईल युजर्सना मोठा धक्का! JIO नंतर आता या कंपनीने वाढवली लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची किंमत
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता देशातील दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने देखील त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. नवीन वर्षात कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.
Maha Kumbh 2025 मध्ये दिसणार टेक्नोलॉजीची ताकद, AI द्वारे होणार वाहनांचं पार्किंग
यापूर्वी, जिओने आपल्या एका प्लॅनची व्हॅलिडीटी कमी केली होती. आता Vodafone Idea (Vi) ने देखील आपला सर्वात स्वस्त प्लॅन महाग केला आहे. Vodafone Idea (Vi) ने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम अशा लोकांवर होईल जे काही कामासाठी छोटा इंटरनेट प्लॅन घेतात. या प्लॅनची वाढलेली किंमत कंपनीच्या वेबसाइटवर दिसत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Vi ने जुलै 2024 मध्ये आपल्या सर्वात स्वस्त डेटा प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. ज्यामुळे 19 रुपयांच्या डेटा प्लॅनची किंमत 22 रुपये झाली होती. ही किंमत एकदा वाढली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, आता हा प्लॅन 23 रुपयांचा झाला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 1GB इंटरनेट डेटा देते आणि त्याची व्हॅलिडीटी एका दिवसासाठी आहे. युजर्सना आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी 23 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना 19 रुपयांमध्ये 1.5GB डेटा ऑफर करते. पूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी बेस प्लॅनइतकीच होती, पण आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता यूजर्सना 19 रुपयांमध्ये 1.5GB डेटा मिळेल, मात्र त्याची व्हॅलिडीटी एक दिवसाची असणार आहे. म्हणजेच हा प्लॅन फक्त एका दिवसासाठी व्हॅलिड असेल.
मार्चपर्यंत देशातील 75 मोठ्या शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी सुरू करणार असल्याचे Vi ने म्हटले आहे. या शहरांमधील त्या औद्योगिक केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे जेथे डेटाचा वापर जास्त आहे. कंपनी आपल्या 5G रिचार्ज प्लॅनची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेत 15 टक्क्यांपर्यंत कमी ठेवू शकते. यामुळे एअरटेल आणि जिओवर त्यांचे रिचार्ज प्लॅन स्वस्त करण्यासाठी दबाव वाढू शकतो.
179 रुपयांचा Vi प्लॅन: Vi च्या 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 1GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय तुम्हाला 24 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि 300 एसएमएस मिळतात.
249 रुपयांचा Vi प्लॅन: 249 रुपयांचा प्लॅन 24GB डेटासह येतो (प्रतिदिन 1GB मर्यादित). याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 मोफत आउटगोइंग मॅसेज ऑफर केले जातात.
155 रुपयांचा Vi प्लॅन: Vi चा 155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन संपूर्ण व्हॅलिडीटीसाठी एकूण 1GB डेटा ऑफर करतो. याशिवाय तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि 20 दिवसांसाठी 300 एसएमएस मिळतात.
स्मार्टफोनच्या Lock Screen वर अशा पद्धतीने सेव्ह करा ‘Emergency Contact’, संकटकाळी होईल मदत
239 रुपयांचा Vi प्लॅन: 239 रुपयांचा प्लॅन 20GB डेटासह येतो (प्रतिदिन 1GB मर्यादित). याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 मोफत आउटगोइंग मॅसेज ऑफर केले जातात.
189 रुपयांचा Vi प्लॅन: Vi चा 189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन संपूर्ण व्हॅलिडीटीसाठी एकूण 1GB डेटा ऑफर करतो. याशिवाय तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि 26 दिवसांसाठी 300 एसएमएस मिळतात.