Maha Kumbh 2025 मध्ये दिसणार टेक्नोलॉजीची ताकद, AI द्वारे होणार वाहनांचं पार्किंग
13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा आयोजित केला जात आहे. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक प्रयागराजला जाणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी भाविक ट्रेनने, विमानाने किंवा स्वत:च्या गाडीने देखील जातात. महाकुंभ मेळ्यावेळी गाड्या घेऊन येणाऱ्या भाविकांना पार्किंगमध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यावेळी संगम शहर प्रयागराजमध्ये पार्किंगसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. AI च्या मदतीने कुंभमेळा परिसरात बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था अधिक सुखकर होणार आहे.
स्मार्टफोनच्या Lock Screen वर अशा पद्धतीने सेव्ह करा ‘Emergency Contact’, संकटकाळी होईल मदत
महाकुंभ मेळा 2025 मध्ये AI च्या मदतीने पार्किंगची सोय होणार आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात AI च्या मदतीने पार्किंग व्यवस्थापन सिस्टम लागू करण्याची ही पहिलीच वेळ असेल. पार्क+ या ऑटो टेक सुपर ॲप कंपनीने ही सिस्टम विकसित केली आहे. या ॲपच्या माध्यमातून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने सहज पार्क करता येणार आहेत. महाकुंभ 2025 साठी पार्क+ ची अधिकृत पार्किंग भागीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
पार्क+ ॲपद्वारे भाविक आता त्यांचे वाहन पार्क करण्यासाठी योग्य जागा शोधू शकतात. हे ॲप कुंभमेळा परिसरात पार्किंगची प्रक्रिया आणखी सोपी करण्यास मदत करेल. यासोबतच, FASTag चा वापर वाहन पार्क करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, जेणेकरून पार्किंगचे पेमेंट कोणत्याही अडचणीशिवाय सहज करता येईल. या तंत्रज्ञानामुळे पार्किंगमध्ये लागणारा वेळही कमी होणार आहे.
स्मार्ट पार्किंग स्लॉट बुकिंग: भाविक आता ॲपद्वारे त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग स्लॉट अॅडव्हान्समध्ये बुक करू शकतात.
सुरक्षित पार्किंग: ॲपच्या माध्यमातून भाविकांना त्यांची वाहने केवळ प्रशासनाने मंजूर केलेल्या पार्किंग परिसरातच पार्क करता येणार आहेत. यासोबतच या पार्किंगच्या ठिकाणी 24X7 कॅमेऱ्याची सुरक्षा देखील असेल.
Watch Free Movies: बॉलीवडपासून हॉलीवूडपर्यंत, आता फ्रीमध्ये पाहता येणार लेटेस्ट चित्रपट!
ईव्ही चार्जिंग आणि वैद्यकीय सहाय्य: पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आणि वैद्यकीय सहाय्य पथकांची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
यंदा महाकुंभमेळ्याला 40 कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही मोठी संख्या लक्षात घेऊन पार्क+ ॲपचे स्मार्ट पार्किंग सोल्यूशन 25 लाख वाहनांच्या पार्किंगची सोय करेल. महाकुंभ मेळ्यात 45 दिवस भाविकांसाठी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.
भाविकांना त्यांची वाहने 30 हून अधिक शासकीय मान्यताप्राप्त पार्किंगच्या ठिकाणी पार्क करता येणार आहेत. या पार्किंगच्या ठिकाणी 5 लाखांहून अधिक वाहने पार्क करता येतील. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने पार्किंगचा त्रास बऱ्याच अंशी कमी होणार आहे. हे स्मार्ट पार्किंग उपाय महाकुंभ 2025 अधिक सुलभ आणि आयोजित करण्यात मदत करेल, जेणेकरून भाविकांना पार्किंगसाठी तासनतास थांबावे लागणार नाही.