काळ सत्य उघड! iPhone चोरीला गेल्यानंतर त्याचं नक्की काय होतं? A ते Z माहिती जाणून घ्या
Apple चा iPhone म्हणजे सध्याच्या काळात एक स्टेटस सिम्बॉल ठरतं आहे. प्रत्येक व्यक्तिला वाटतं की आपल्याकडे आयफोन असला पाहिजे. आयफोनची किंमत जास्त असली तरी त्याचे फायदे देखील अनेक आहेत. आयफोनची कॅमेरा क्वालिटी आणि सिक्योरिटी देखील प्रचंड हाय आहे. त्यामुळे आयफोन इतर स्मार्टफोनपेक्षा सुरक्षित आहे, असा दावा कंपनीकडून वारंवार केला जातो.
लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी
मान्य आहे की, आयफोनला हॅक करणं प्रचंड कठीण आहे. पण आयफोन चोरी करणं तर सोपं आहे. आयफोन चोरी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. पण या चोरी झालेल्या आयफोनचं नक्की काय होत, याबाबत अनेकांना माहिती नसतं. Apple चे iPhones खूप सुरक्षित आहेत, पण तरीही लोक ते चोरतात. चोरी केल्यानंतर या आयफोनचं नक्की काय होतं? कारण आयफोन अनलॉक करणं खूप कठिण आहे, मग लोकं चोरी केलेला आयफोन नेमका वापरतात तरी कसा? (फोटो सौजन्य – pinterest)
चोरीला गेलेले बहुतेक iPhones स्थानिक बाजारात थेट वापरले किंवा विकले जात नाहीत. त्याऐवजी, हे फोन ब्लॅक मार्केटमध्ये नेले जातात, जे सामान्य लोक आणि अधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
चोरीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ चीनच्या शेनझेन शहरात आहे. येथील युआनवांग डिजिटल मॉल आणि लुओहू कमर्शियल सिटी सारख्या बाजारपेठा चोरीच्या फोनच्या व्यवसायासाठी ओळखल्या जातात. या मार्केटमध्ये, असे लोक आहेत जे फोन मोडून काढण्यात आणि त्यांचे भाग विकण्यात माहिर आहेत, ज्यामुळे फोन ट्रॅक करणे कठीण होते.
पार्ट्स काढून टाकले जातात: या मार्केटमध्ये, आयफोन मोडून टाकले जातात आणि त्यांचे पार्ट्स विकले जातात. असे केल्याने फोन ट्रॅक करता येत नाही आणि ॲपलची सुरक्षा यंत्रणाही काम करत नाही.
सागरी मार्गाने इतर शहरांमध्ये जातात: चोरलेले आयफोन अनेकदा सागरी मार्गाने चीनच्या शेनझेन शहरात नेले जातात. ही एक अतिशय गुप्त पद्धत आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांना या क्रियाकलापांचा शोध घेणे कठीण होते.
अनलॉक करणे कठीण: इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत आयफोन प्रचंड सुरक्षित आहे. आयफोन हॅक करणे आणि अनलॉक करणे कठीण आहे. आयफोन अनलॉक करून विकणे खूप अवघड आहे.
अमेरिकेतील एका सरकारी कार्यालयाने म्हटले आहे की, सर्वाधिक बनावट आणि चोरीच्या वस्तू चीनमध्ये विकल्या जातात. चीनच्या शेनझेन शहरात चोरीचे फोन आणि त्यांचे पार्ट्स मोठ्या प्रमाणात विकले जातात. ऍपल फोनमध्ये ॲक्टिव्हेशन लॉक आणि फाइंड माय आयफोन सारखी उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यामुळे चोरांना हे फोन वापरता येत नाहीत. परंतु या सुरक्षेमुळे, एक नवीन व्यवसाय सुरू झाला आहे, चोरीला गेलेल्या आयफोनचे पार्टस काढून विकणे.