Year Ender 2024: 2024 मध्ये Wikipedia वर सर्वात जास्त काय वाचले गेले? जाणून घ्या
2024 हे वर्ष आता काही दिवसात इतिहासाच्या पानांमध्ये जाणार आहे, त्यामुळे इंटरनेटच्या या जगात लोक कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष देत होते ते जाणून घेऊया. सहसा लोक विकिपीडियावर अनेक गोष्टी शोधतात. या वर्षी इंटरनेटवर सर्वात जास्त काय शोधले हे तुम्हाला माहीत आहे का? दररोज प्रत्येकाच्या मनात काही प्रश्न येतात आणि लोक त्यांची उत्तरे इंटरनेटवर शोधतात, ज्यामध्ये बहुतेक लोक विकिपीडियाची मदत घेतात. या वर्षी विकिपीडियावर कोणात्या विषयाचे वाचन झाले याबद्दल जाणून घेऊया.
काही क्षणातच मिळणार तुमच्या अवघड प्रश्नांची उत्तरं, गुगलची Willow क्वांटम चिप अखेर लाँच
जगभरातील लोकं माहिती शोधण्यासाठी विकिपीडियाचा वापर करतात. विकिपीडिया ज्ञानाचं भंडार आहे. भारतातील राजकारण असो किंवा अमेरिकेतील, क्रिकेट असो किंवा फुटबॉल, अभिनेता असो किंवा अभिनेत्री, विकिपीडियावर सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्ही एका क्लिकवर विकिपीडियावर सर्व माहिती वाचू शकता.
विकिमीडिया फाउंडेशन या विकिपीडिया चालवणाऱ्या संस्थेने या वर्षी सर्वाधिक पाहिलेल्या पेजेसची यादी जाहीर केली आहे. या वर्षी विकिपीडियावर कोणत्या गोष्टी ट्रेंडिग होत्या आणि लोकांनी कोणते टॉपिक्स सर्वाधिक वाचले आहेत, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबरपर्यंत, इंग्रजी विकिपीडिया जगभरात 76 अब्ज वेळा पाहिला गेला होता. चला तर मग या वर्षी विकिपीडियावर कोणते पेज सर्वाधिक वाचले गेले, याबद्दल जाणून घेऊया.
डेथ इन 2024 हा टॉपिक या यादीत टॉपवर आहे. डेथ इन 2024 हे पेज 4 कोटी 40 लाखांहून अधिक वेळा रिड करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा टॉपिक यादीत टॉप 3 मध्ये आहे.
लोकांनी अमेरिकन नेते, टेलर स्विफ्ट सारख्या सेलिब्रिटी, अमेरिकन चित्रपट, क्रीडा स्पर्धा आणि भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल विकिपीडियावर सर्च केले आहेत. गेल्या वर्षी सर्वाधिक पाहिलेल्या टॉपिकमध्ये ChatGPT टॉपवर होता. मात्र यंदा तो बाराव्या क्रमांकावर आला आहे. याचा अर्थ लोकांची आवड आता इतर विषयांकडेही वळत आहे.
Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित