Realme चा हा स्मार्टफोन 11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी! Amazon वर जबरदस्त डील्स उपलब्ध
तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर Realme Narzo N65 5G स्मार्टफोन 11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. Amazon वर तुम्हाला जबरदस्त डिल्स आणि ऑफर्ससह Realme चा हा फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन हेवी प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले सारख्या वैशिष्ट्यांसह येतो.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Realme Narzo N65 5G वर उपलब्ध डीलबद्दल जाणून घेऊया. या फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Amazon वर 13,999 रुपयांच्या MRP किंमतीऐवजी 11,498 रुपयांना लिस्ट झाला आहे. म्हणजेच येथे ग्राहकांना फोनवर 2,501 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय येथील ग्राहकांना 1000 रुपयांचे कूपनही दिले जात आहे. त्यामुळे, कूपन लागू केल्यानंतर, ग्राहकांसाठी फोनची किंमत 10,498 रुपये होईल. म्हणजेच 13,999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्हाला 10,498 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सही ग्राहकांना दिल्या जात आहेत, ज्याद्वारे ग्राहकांना फोनवर काही अतिरिक्त सूट मिळू शकते. फोनवर एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे. ग्राहक त्यांच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून 10,850 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. तथापि, जास्तीत जास्त सवलतीसाठी, तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे. ॲमेझॉनवर ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही दिले जात आहेत.
Realme Narzo N65 5G मोबाईल 27 मे 2024 रोजी लाँच झाला आहे. फोनमध्ये 6.67-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले (HD+) देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4GB, 6GB आणि 8GB रॅम अशा चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme Narzo N65 5G Android 14 वर चालतो आणि या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. Realme Narzo N65 5G वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi, GPS आणि USB Type-C दोन्ही सिम कार्डवर सक्रिय 4G सह समाविष्ट आहे. हा फोन Dimensity 6300 5G प्रोसेसर सह येतो.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
फोटोग्राफीसाठी, Realme Narzo N65 5G च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यात सेल्फीसाठी सिंगल फ्रंट कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8-मेगापिक्सेल सेन्सर आहे. Realme Narzo N65 5G Android 14 आधारित कस्टम OS वर चालतो आणि त्यात 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. यात धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंग आहे.