फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर Vivo Y300 खरेदी करण्याची सुवर्णसंधी! पहिल्या सेलवर मिळणार धमाकेदार ऑफर्स
टेक कंपनी Vivo चा नवीनतम स्मार्टफोन Vivo Y300 5G अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सेल आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर लाईव्ह झाली आहे. तुम्ही पहिल्या सेलमधून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला अनेक चांगल्या ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. Vivo Y300 5G स्मार्टफोन विवो ई-स्टोअरवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरून ऑफर्ससह Vivo Y300 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीने हा नवीनतम स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. Vivo Y300 5G स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB व्हेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर Vivo Y300 5G स्मार्टफोनचा 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंट 23,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन फँटम पर्पल, एमराल्ड ग्रीन आणि टायटॅनियम सिल्व्हर रंग यामध्ये खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Vivo)
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची सेल लाईव्ह झाली आहे. पहिल्या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. तसेच Vivo TWS 3e इयरबड्स मोफत उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 1,499 रुपये आहे. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल. तुमचा जुना फोन अपग्रेड करण्याची ही चांगली संधी आहे.
Vivo Y300 मध्ये 8GB RAM आणि octa-core Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मेमरी कार्डद्वारे वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार स्टोरेज वाढवू शकतात. त्याची मर्यादा 1 टीबी पर्यंत आहे. विवोच्या नवीन फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आणि Android 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे, जो FunTouch OS 14 वर आधारित आहे.
स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.67 इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे, जो 1800 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो आणि त्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कॅमेराच्या बाबतीत, यात f/1.79 अपर्चरसह 50MP मुख्य कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि ऑरा लाइट आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल व्ह्यू व्हिडिओ फीचरसह येतो.
सुरक्षिततेसाठी, Vivo Y300 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 80W चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी 5,000 mAH बॅटरी आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग देखील आहे.