BSNL BiTV: BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळणार 450+ लाईव्ह टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये पाहण्याची संधी! कसं, ते जाणून घ्या
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी तर ओळखली जातेच, पण आता कंपनीने त्यांच्या युजर्सच्या फायद्यासाठी आणखी नवीन सेवा देखील सुरु केली आहे. ज्यामध्ये युजर्सना 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहण्याची संधी मिळणार आहे. सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अलीकडेच त्यांच्या ग्राहकांसाठी BiTV लाँच केले आहे. ही एक डायरेक्ट-टू-मोबाइल टीव्ही सेवा आहे जी युजर्सना 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहण्याची संधी देत आहे.
BSNL ने ओटीटी प्लेच्या भागीदारीत ही नवीन सेवा सुरू केली आहे, जेणेकरून देशभरातील मोबाइल वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय BiTV चा आनंद घेऊ शकतील. तुम्हाला देखील BSNL BiTV चा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही केवळ 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनच्या मदतीने BiTV चा आनंद घेऊ शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL ने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर घोषणा केली आहे की 99 रुपयांच्या सर्वात स्वस्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन असलेले ग्राहक देखील BiTV पूर्णपणे मोफत वापरू शकतात. यासाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या सूचनांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये परवडणाऱ्या व्हॉइस-ओन्ली प्लॅन सुरू करण्याचे म्हटले होते.
BiTV ही BSNL ची डायरेक्ट-टू-मोबाइल टीव्ही सेवा आहे, जी ग्राहकांना 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल, वेब सिरीज आणि चित्रपट पाहण्याची परवानगी देते. त्याच्या चाचणी टप्प्यात 300 हून अधिक मोफत टीव्ही चॅनेल उपलब्ध करून देण्यात आले होते, परंतु आता ही सेवा सर्व BSNL सिम कार्डसह पूर्णपणे कार्यरत आहे.
BSNL ग्राहक कोणत्याही BSNL मोबाइल प्लॅनसह बीआयटीव्ही पूर्णपणे मोफत वापरू शकतात. ही सुविधा BiTV अॅपद्वारे उपलब्ध असेल, ज्यामुळे स्मार्टफोन वापरकर्ते त्यांचे आवडते शो आणि चित्रपट कुठेही पाहू शकतील. आता BSNL च्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्त दरात मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.
BSNL ने अनेक दीर्घकालीन योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळते. असाच एक उत्तम प्लॅन म्हणजे 797 रुपयांचा रिचार्ज, जो 300 दिवसांच्या वैधतेसह येतो. हे विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे BSNL चा दुय्यम सिम म्हणून वापरतात किंवा फक्त नंबर सक्रिय ठेवू इच्छितात.
Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!
या प्लॅनमध्ये सिम 300 दिवसांसाठी सक्रिय राहील. पहिल्या 60 दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग उपलब्ध असेल. तुम्हाला पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. तुम्हाला पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत मिळतील. 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर, कॉलिंग आणि डेटा फायदे संपतील, परंतु सिम 300 दिवसांसाठी सक्रिय राहील.