Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!
अनेक सिनेमे आणि टिव्ही शोमध्ये तुम्ही पाहिले असेल की महाकुंभ मेळ्याच्या गर्दीत लोकं त्यांच्या कुटूंबापासून वेगळे होतात. आता ह्याच कुटूंबापासून ताटातूट झालेल्या लोकांना परत त्यांच्या कुटूंबाला भेटवण्यासाठी आता टेलिकॉम कंपनी Vi मदत करणार आहे. महाकुंभमेळ्यासाठी ‘Vi नंबर रक्षक’ उपक्रमाची घोषणा Vi ने केली आहे. महाकुंभमेळ्यात आपल्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून विभक्त झालेल्या लोकांना त्यांच्या ओळखीच्या लोकांशी पुन्हा जोडणे हा Vi ने सुरु केलेल्या उपक्रमाचा उद्देश आहे.
मेळ्यात लाखो लोकांमध्ये आपल्या हरवलेल्या प्रियजनांना शोधणे हे खरोखरच एक मोठे आव्हान आहे, जे VI ने समजून घेतले आहे आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत Vi ने त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच कुंभमेळ्यात Vi ने काही स्टॉल देखील सुरु केले आहेत, ज्या ठिकाणी हे उपक्रम राबवले जात आहेत. (फोटो सौजन्य –Vi X account)
या उपक्रमाचा उद्देश असा आहे की कोणीही एकटे पडू नये, विशेषतः वृद्ध आणि ज्यांच्याकडे मोबाईल फोन किंवा डिजिटल उपकरण नाही अशा मुलांना त्यांच्या कुटूंबाकडे परत नेण्यासाठी Vi चा नवीन उपक्रम मदत करणार आहे. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार 250 हून अधिक लोक बेपत्ता होते, तर 2013 च्या कुंभमेळ्यात सुमारे 70,000 लोक बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. हे लक्षात घेऊन, VI ने ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कुंभमेळ्यात कोणतीही व्यक्ती त्याच्या कुटूंबापासून वेगळी झाली किंवा हरवली तर त्या व्यक्तिला आता Vi मदत करणार आहे.
At #MahaKumbhMela, where millions gather, getting separated from loved ones is a real concern! That’s why we’ve launched Vi Number Rakshak — a simple yet powerful initiative to help reunite lost pilgrims. We have set up the Vi Number Rakshak booth at a prominent area near the… pic.twitter.com/aW44BUOETl
— Vi_News (@ViNewsOfficial) February 4, 2025
‘Vi नंबर रक्षक’ उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी रामानंद आचार्य शिबिर आखाड्याजवळ एक समर्पित बूथ उभारण्यात आला आहे, जिथे पवित्र रुद्राक्ष आणि तुळशीच्या मण्यांनी बनवलेल्या ‘मनका’ माळेवर आपत्कालीन संपर्क क्रमांक कोरण्यात आले आहेत. यामुळे यात्रेकरूंना मोबाईल फोन किंवा इंटरनेट अॅक्सेसवर अवलंबून न राहता त्यांच्या प्रियजनांशी पुन्हा संपर्क साधण्यास मदत होते. ज्यांना डिजिटल उपकरणांबद्दल जास्त माहिती नाही त्यांना हा उपक्रम विशेषतः मदत करतो. कुंभमेळ्यातील प्रत्येत व्यक्तिसाठी Vi चा हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.
Vi ने त्रिवेणी संगम आणि आसपासच्या भागात त्यांचे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले आहे. कंपनीने 30 नवीन नेटवर्क साइट्स जोडल्या आहेत. याव्यतिरिक्त, आवश्यक क्षेत्रे कव्हर करण्यासाठी सुमारे 40 मॅक्रो आणि हाई-पावर्ड स्मॉल-सेल तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, बॅकहॉल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 32 किमी फायबर बसवण्यात आले आहे. हे स्पष्ट व्हॉइस कॉल, सहज व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर सुनिश्चित करते. खूप गर्दीच्या ठिकाणीही Vi चा नेटवर्क तुम्हाला फायद्याचा मदत करणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान Vi वापरकर्त्यांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी हे अपग्रेड डिझाइन केले आहे.