बोट लावताच चार्ज होणार तुमचा स्मार्टफोन! विजेचा नाही तर घामाचा वापर होणार, नेमकं प्रकरण आहे काय?
आपल्या आयुष्यात स्मार्टफोन खूप महत्त्वाचा आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता स्मार्टफोन देखील आपली गरज बनली आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. आपण दिवसभर आपल्या स्मार्टफोनचा इतका वापर करतो, की त्याची चार्जिंग सतत संपते. आपण घरी किंवा ऑफीसमध्ये असू तर आपण आपला स्मार्टफोन लगेच चार्जिंगला लावू शकतो. पण प्रवासात असताना आपल्या स्मार्टफोनची बॅटरी संपली तर आपल्याला प्रचंड समस्या निर्माण होतात.
YouTube Premium: फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत
पण प्रवासात स्मार्टफोन चार्ज करणार तरी कसा, असा प्रश्न आपल्यासमोर असतोच. पण यासाठी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही केवळ तुमच्या बोटांनी तुमचा फोन चार्ज करू शकता. होय, हे खरं आहे. आता आपण बोटांनीही फोन चार्ज करू शकतो. काही वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी एक असे गॅझेट तयार केले आहे जे आपल्या बोटांच्या घामातून वीज निर्माण करते आणि त्यानंतर त्या विजेने फोन चार्ज होतो. यामुळे आता स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला विजेचा वापर करण्याची देखील गरज लागणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
डेली मेलनुसार, कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन गॅझेट तयार केलं आहे. हे एक लहान गॅझेट आहे, जे तुम्ही अगदी सहज तुमच्या बोटवर परिधान करू शकता. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या बोटांना थोडा घाम येतो. या घामापासून हे गॅझेट वीज निर्माण करते. या विजेच्या मदतीने आपण आपला फोन किंवा घड्याळ चार्ज करू शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे गॅझेट 10 तास परिधान केल्याने आपला फोन दिवसभर चालू शकतो.
मात्र, या मशिनने फोन चार्ज करणे सध्या इतके सोपे नाही. गॅझेट बोटावर पट्टीप्रमाणे बांधावे लागते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या बोटांना थोडा घाम येतो. या घामापासून हे यंत्र वीज निर्माण करते. पण तुम्हाला तीन आठवडे हे गॅझेट सतत परिधान करावे लागेल, तरच तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकणार आहात. हे गॅझेट तुम्हाला प्रवासात फायदेशीर ठरणार आहे. या गॅझेटला वापरण्याचा कालावधी कमी व्हावा, यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञ या गॅझेटमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे एक छोटी गॅझेट आहे जे बँड-एडसारखे दिसते. ते बोटावर चिकटवले जाते. त्यात स्पंजसारखी वस्तू असते जी आपला घाम शोषून घेते. मग या घामाचे विजेत रुपांतर होते.
Google Pixel 9a: कधी लाँच होणार गुगलचा नवीन स्मार्टफोन? नवीन अपडेट आलं समोर
ही एक पातळ आणि लवचिक पट्टी आहे जी बोटाभोवती गुंडाळली जाऊ शकते, जसे आपण प्लास्टर लावतो. या पट्टीच्या आत स्पंजसारखा पदार्थ असतो जो आपला घाम शोषून घेतो. हा स्पंज या घामाचे विजेमध्ये रूपांतर करतो. जेव्हा आपले बोट घामाने ओले होते किंवा आपण ही पट्टी दाबतो तेव्हा त्यातून जास्त वीज निर्माण होते. ही पट्टी तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी तीन वर्षे मेहनत घेतली असून आता ती लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.