Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: बाथरूमपेक्षाही घाण आहे तुमचा Earphone, आजच अशा पद्धतीने करा क्लिन

इअरफोन्सचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. इयरफोन आणि हेडफोनचा अतिवापर करणे देखील वापरकर्त्यांसाठी धोकादायक ठरू शकते. इयरफोनचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त वाढवला तर ते तुमच्या कानाला हानी पोहोचवू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 29, 2025 | 07:45 PM
Tech Tips: बाथरूमपेक्षाही घाण आहे तुमचा Earphone, आजच अशा पद्धतीने करा क्लिन

Tech Tips: बाथरूमपेक्षाही घाण आहे तुमचा Earphone, आजच अशा पद्धतीने करा क्लिन

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोनसोबत आणखी एका गॅझेटचा वापर देखील वाढला आहे, आणि हे गॅझेट म्हणजे इअरफोन. सध्याच्या डिजीटल काळात इअरफोन आणि हेडफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नेहमी इअरफोन आणि हेडफोन वापरणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. स्मार्टफोन्स, इअरफोन्स आणि हेडफोन्सच्या आगमनाने आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. पण सतत वापरल्या जाणाऱ्या इअरफोन्सच्या स्वच्छतेची काळजी घेणं फार गरजेचं आहे.

Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

कानात इअरफोन लावून गाणी ऐकण्यात एक वेगळाच आनंद मिळतो, पण त्याच्या स्वच्छतेकडे फार कमी लोक लक्ष देतात. इअरफोन्स वेळोवेळी स्वच्छ न केल्यास कानाला संसर्गही होऊ शकतो. जर तुम्ही देखील सतत इअरफोनचा वापर करत असाल तर त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुमचे इअरफोन्स खराब होऊ शकतात. तुम्ही तुमचे इअरफोन अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशा प्रकारे तुमचे इअरफोन स्वच्छ करा

इअरफोन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा. प्रथम कोमट पाण्याने कापड ओले करून इअरफोनचे बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करा. साफसफाई करताना इअरफोनवर जास्त जोर देऊ नका, अन्यथा ते डॅमेज होण्याची शक्यता असते. इअरफोनचे रबर किंवा सिलिकॉन इयरटिप्स काढून टाका आणि कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवा. इयरफोन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जंतुनाशक वाइप देखील वापरू शकता. असे केल्याने इअरफोनवरील बॅक्टेरिया तर निघतीलच पण चमकही येईल. त्यामुळे तुमचे इअरफोन अगदी नव्या सारखे चमकू लागतील. इअरफोनचे रबर किंवा सिलिकॉन इयरटिप्स कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर ते काही काळ सुकण्यासाठी ठेवा आणि नंतर त्याचा वापर करा .

इअरफोनचे छोटे कोपरे आणि ग्रिल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरड्या किंवा किंचित ओल्या कापसाच्या गोळ्याचा वापर करू शकता. याशिवाय इअरफोनच्या ग्रीलमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करा. इअरफोनचे बाहेरील कोपरे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश वापरू शकता. बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी तुम्ही इअरफोन आयसोप्रोपाइल अल्कोहोल कापड किंवा स्वॅबने देखील स्वच्छ करू शकता.

इअरफोन्सचा अतिवापर तुमच्यासाठी घातक ठरेल

इअरफोन्सचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. इयरफोन आणि हेडफोनचा अतिवापर करणे देखील वापरकर्त्यांसाठी धोकादायक ठरू शकते. इअरफोन्स आणि हेडफोन्सचा जास्त आणि सतत वापर केल्याने तुमच्या कानावर अनेक हानिकारक परिणाम होऊ शकतात. जास्त इयरफोन आणि हेडफोन वापरल्याने तुमच्या कानाला नुकसान होऊ शकते. असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना इअरफोन किंवा हेडफोनद्वारे मोठ्या आवाजात संगीत ऐकणे आवडते. परंतु असं करणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

Samsung नवीन Tri-Fold स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

तुम्ही तुमच्या इयरफोनचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त वाढवला तर ते तुमच्या कानाला हानी पोहोचवू शकते. इअरफोन्स आणि हेडफोन्सच्या माध्यमातून गाणी किंवा काहीही जास्त आवाजात ऐकल्याने तुमच्या कानाची प्रत्यक्ष ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होते. असे अनेकवेळा घडते की जेव्हा कोणी तुमच्याकडे तुमचे इयरफोन किंवा हेडफोन्स मागितले तर तुम्ही ते लगेच त्याला देता. याशिवाय, तुम्ही कधी कधी दुसऱ्याचे इअरफोन वापरत असाल. पण असं केल्याने तुमच्या कानात संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला नंतर काही गंभीर आजार होऊ शकतात.

Web Title: Tech tips how to clean your earphone and know about side effects earphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.