
Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा 'या' टिप्स
डीपफेक एक असे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान आहे, जे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगच्या मदतीने खोटे व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ तयार करू शकते. यामध्ये कोणत्याही महिलेचे किंवा लहान मुलांचे फोटो अश्लील व्हिडिओ, आक्षेपार्ह कंटेट किंवा महत्त्वाच्या किंवा खोट्या विधानासोबत जोडले जाते. यामुळे लोकांच्या सामाजिक जीवनावर याचा फार मोठा परिणाम होतो. (फोटो सौजन्य – AI Created)
महिला आणि लहान मुलांना डीफफेकचे अगदी सहज शिकार बनवले जाते. याची कारणं जाणून घेऊया.
Ans: Deepfake हे AI (Artificial Intelligence) वापरून तयार केलेले बनावट फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ असतात, ज्यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा हालचाली खऱ्यासारख्या दाखवल्या जातात.
Ans: Deepfake चा वापर फसवणूक, बदनामी, ब्लॅकमेल, खोट्या बातम्या आणि सायबर गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो.
Ans: महिलांचे व मुलांचे फोटो-व्हिडिओ गैरवापरासाठी वापरले जाण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.