Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम… दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

ऑनलाईन फ्रॉड आणि स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार आधार कार्ड संबंधित माहिती यूजर्सकडून उकळण्याचा प्रयत्न करत असतात. आधार कार्ड सुरक्षित कसं ठेवायचं असा प्रश्न यूजर्ससमोर असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 10, 2026 | 11:10 AM
Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम... दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम... दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

Follow Us
Close
Follow Us:
  • आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे 5 नियम’ पाळा
  • आधार कार्ड फ्रॉडपासून वाचायचंय?
  • UIDAI च्या 5 सूचना आत्ताच वाचा
आजच्या काळात आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र राहिलेले नाही. आधार कार्ड एक महत्त्वाचा पुरावा बनला आहे, जो आपल्या प्रत्येक कामासाठी महत्त्वाचा आहे. शाळेत अ‍ॅडमिशन घेण्यापासून अगदी जॉबसाठी अप्लाय करण्यापर्यंत आधार कार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणी फायद्याचं ठरतं. बँकिग, सिम कार्ड आणि अनेक ऑनलाईन सेवा थेट आधार कार्डसोबत जोडलेल्या असतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या आधार कार्डची माहिती एखाद्या चुकीच्या व्यक्तिच्या हाती लागली, तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हेच धोके लक्षात घेऊन UIDAI ने आधार सुरक्षेबाबत काही गाइडलाइंस जारी केल्या आहेत. तुम्हाला जर तुमची माहिती आणि आधार कार्ड डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतील तुम्हाला UIDAI च्या गाइडलाइंस लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स

कधीही ओटीपी शेअर करू नका

आधार संबंधित ओटीपी सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. यामुळेच UIDAI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तुमचा ओटीपी कोणत्याही व्यक्तिसोबत शेअर करू नका. बँक कर्मचारी किंवा कोणताही अधिकारी तुमच्याकडे ओटीपीची मागणी करत नाहीत. ओटीपीशिवाय कोणतीही व्यक्ती तुमच्या आधार अकाऊंटपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे नेहमी तुमचा ओटीपी सुरक्षित ठेवा. (फोटो सौजन्य – AI Created)

बायोमेट्रिक लॉक चालू करा

तुम्ही UIDAI ची वेबसाईट किंवा आधार अ‍ॅपवरून तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक करू शकता. असं केल्यानंतर कोणतीही व्यक्ती तुमच्या फिंगरप्रिंट, डोळ्यांची ओळख किंवा फेस डेटाचा चुकीचा वापर करू शकणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही स्वत: ही माहिती अनलॉक करू शकता.

आधारची माहिती ऑनलाइन शेयर करू नका

सोशल मीडिया किंवा कोणत्याही पब्लिक वेबसाईटवर आधार कार्डचा फोटो शेअर करू नका. ऑनलाइन प्लेटफॉर्मवर शेअर करण्यात माहिती हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगार अगदी सहज कॉपी करू शकतात आणि याचा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

‘Masked Aadhaar’ चा वापर करा

जिथे तुम्हाला ओळखपत्रासाठी आधार कार्ड द्यावा लागते, तिथे पूर्ण आधार कार्ड देण्यापेक्षा ‘मास्क्ड आधार’ चा वापर करा. यामध्ये आधारचे पहिले 8 नंबर लपलेले असतात आणि केवळ शेवटचे 4 अंक दिसतात.

Free Fire Max: गेममधील आतापर्यंतचे सर्वात बेस्ट इव्हेंट! प्रीमियम बॅकपॅक आणि वेपन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

केवळ अधिकृत हेल्पलाइनचा वापर करा

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आधारचा चुकीचा वापर केला जात आहे किंवा तुम्ही सायबर गुन्हेगारीचे शिकार होत आहात तर तुम्ही कारवाई करू शकता. सायबर क्राईमवर तक्रार दाखल करण्यासाठी 1930 वर कॉल करा आणि आधार संबंधित मदतीसाठी UIDAI हेल्पलाइन 1947 वर संपर्क करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आधार कार्ड बनवणे बंधनकारक आहे का?

    Ans: आधार कार्ड बंधनकारक नाही, पण सरकारी योजना, सबसिडी, बँक व KYC साठी ते मोठ्या प्रमाणात आवश्यक ठरते.

  • Que: आधार कार्डमध्ये कोणती माहिती असते?

    Ans: नाव, जन्मतारीख/वय, लिंग, पत्ता, फोटो, बायोमेट्रिक माहिती आणि 12 अंकी आधार क्रमांक असतो.

  • Que: आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करता येते का?

    Ans: होय. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि फोटो UIDAI केंद्र किंवा ऑनलाइन अपडेट करता येतो.

Web Title: How to keep your aadhaar card safe know 5 important rules of uidai tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • aadhaar card
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
1

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा ‘या’ पद्धतीने करा वापर, कामात एकाग्रता वाढण्यासोबतच बॅटरी राहील जास्त वेळ टिकून
2

मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा ‘या’ पद्धतीने करा वापर, कामात एकाग्रता वाढण्यासोबतच बॅटरी राहील जास्त वेळ टिकून

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन
3

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात ‘या’ 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित
4

डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात ‘या’ 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.