Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया

प्रीपेडमधून पोस्टपेजवर स्विच करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळील एअरटेल स्टोअर्स किंवा ऑफिसमध्ये जाऊ शकता. किंवा तुमच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 10, 2026 | 01:11 PM
Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Follow Us
Close
Follow Us:
  • मोबाईल युजर्ससाठी खुशखबर
  • प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये जायचंय?
  • प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याची सोपी ट्रिक
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली एअरटेल त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींचे प्लॅन्स आणि सर्विसेस ऑफर करत असते. प्रत्येक युजर्स त्यांच्या गरजेनुसार प्लॅन्स आणि सर्विसची खरेदी करतात. काही युजर्स प्रीपेड प्लॅन्स वापरतात तरी काही युजर्स पोस्टपेड प्लॅन्सचा वापर करतात. तुम्ही देखील भारती एअरटेलचे यूजर आहात का? तुम्ही सध्या प्रीपेड सर्विसचा वापर करत आहात क? तुम्हाला देखील प्रीपेडमधून पोस्टपेडवर स्विच करायचं आहे का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

कंपनी त्यांच्या ग्राहकांना अशी एक सुविधा देखील ऑफर करते, ज्यामध्ये युजर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये अगदी सहज स्विच करू शकतात. ही प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्हाला यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही प्रीपेडमधून पोस्टपेड सर्विसवर स्विच करू शकणार आहात. सर्वात आधी प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही सर्विसेमधील अंतर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रीपेड आणि पोस्टपेड सर्विसेमधील अंतर

प्रीपेड म्हणजे असे प्लॅन असतात ज्यामध्ये तुम्हाला सर्विसचा वापर करण्यासाठी आधीच पैसे भरावे लागतात. तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग डेटा आणि ओटीटी प्लॅन्सचे फायदे हवे असतील तर तुम्हाला प्रीपेड सर्विसमध्ये आधीच पैसे भरावे लागणार आहेत. मात्र पोस्टपेडमध्ये पूर्णपणे उलट आहे. पोस्टपेडमध्ये तुम्हाला आधी सर्विसचा वापर करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यानुसार पेमेंट करावे लागणार आहे.

खरंतर अनेक युजर्सना असे वाटते की पोस्टपेड प्लॅन अधिक फायद्याचे ठरतात. कारण पोस्टपेड प्लॅनमध्ये बेनिफिट्स ठरवलेले असले तरी देखील तुम्ही यामध्ये जास्त फायदे वापरू शकता. तुम्ही जेवढे फायदे वापरणार आहात तुम्हाला त्यानुसार बिल भरावे लागेल. पोस्टपेड वापरण्यामध्ये कोणतीही कटकट नसते. महिन्याअखेरीस तुम्हाला एक बिल पाठवले जाते हे बिल भरल्यावर तुमचे पेमेंट पूर्ण होते. पोस्टपेड सर्विसमध्ये तुम्ही कोणत्या प्लॅनची निवड करता, त्याची व्हॅलिडीटी किती दिवस असणार आहे, या सर्वांचा विचार करण्याची गरज नसते. याशिवाय एअरटेल त्यांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक ओटीटी बेनिफिट्स देखील ऑफर करतो. यासोबतच यामध्ये फॅमिली मेंबर्सना देखील जोडले जाऊ शकते. त्यामुळे असे अनेक युजर्स आहेत जे पैशांचा विचार न करता पोस्टपेड मोबाईल सर्विसचा वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक फायदे वापरण्याची संधी मिळते.

अशी आहे प्रक्रिया

तुम्ही देखील जर आता प्रीपेड वरून पोस्टपेडवर स्विच करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला थेट तुमच्या जवळील एअरटेल स्टोअर्स किंवा ऑफिसमध्ये जावे लागेल. तसेच तुम्ही मोबाईल ॲप म्हणजेच एअरटेल थँक्स किंवा एअरटेलच्या वेबसाईट वरून देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर पोस्टपेड सेगमेंटमध्ये जा. इथे तुम्हाला स्विच प्रीपेड टू पोस्टपेड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा आणि अपग्रेड टू पोस्टपेड व टॅप करा.

OnePlus Turbo 6: मिडरेंज सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या बॅटरी लाईफसह नव्या स्मार्टफोन्सची झाली एंट्री, फीचर्स आणि किंमत एकदा वाचाच

तुम्हाला टेलिकॉम कंपनीला KYC (Know Your Customer) डॉक्यूमेंट सबमिट करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पोस्टपेड प्लॅनची निवड करावी लागणार आहे. तुमचा फोन नंबर तोच राहील, परंतु तुमची सेवा प्रीपेडवरून पोस्टपेडवर स्विच केली जाईल. या स्विचसाठी कोणतेही शुल्क नाही. प्रीपेडवरून पोस्टपेडवर स्विच करण्यासाठी साधारणपणे 24-48 तास लागतात. त्याहूनही चांगले, या स्विच दरम्यान कोणताही डाउनटाइम नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Airtel Prepaid आणि Postpaid मध्ये काय फरक आहे?

    Ans: Prepaid मध्ये आधी रिचार्ज करून सेवा वापरता येते, तर Postpaid मध्ये महिन्याच्या शेवटी बिल भरावे लागते.

  • Que: Airtel मध्ये Prepaid ते Postpaid स्विच करता येते का?

    Ans: होय. Airtel Store, MyAirtel App किंवा कस्टमर केअरच्या मदतीने स्विच करता येते.

  • Que: repaid ते Postpaid स्विच करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

    Ans: वैध फोटो ओळखपत्र (आधार/पॅन) आणि पत्ता पुरावा आवश्यक असतो.

Web Title: How to switch from prepaid to postpaid this is the easy process for airtel users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
1

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम… दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान
2

Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम… दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स
3

Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स

बिकिनी इमेज ट्रेंडनंतर X चा मोठा निर्णय! आता केवळ ‘या’ यूजर्सना मिळणार Grok AI वर फोटो बनवण्याची सुविधा, नेमकं प्रकरणं काय?
4

बिकिनी इमेज ट्रेंडनंतर X चा मोठा निर्णय! आता केवळ ‘या’ यूजर्सना मिळणार Grok AI वर फोटो बनवण्याची सुविधा, नेमकं प्रकरणं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.