Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमची चिंता संपली! फोनमध्ये आत्ताच ऑन करा हा ऑप्शन, आपोआप डिलीट होईल OTP

ओटीपीचा वापर वापरकर्त्याची ओळख पडताळण्यासाठी केला जातो. नेक वेळा फोनमध्ये अनेक ओटीपी जमा होतात. अशावेळी आपल्या फोनचे स्टोरेज भरते. फोनमधील या सेटिंगच्या मदतीने मदतीने फोनवर येणारा ओटीपी आपोआप डिलीट होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2025 | 08:44 AM
तुमची चिंता संपली! फोनमध्ये आत्ताच ऑन करा हा ऑप्शन, आपोआप डिलीट होईल OTP

तुमची चिंता संपली! फोनमध्ये आत्ताच ऑन करा हा ऑप्शन, आपोआप डिलीट होईल OTP

Follow Us
Follow Us:

आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यातील अनेक फीचर्स युजर्सच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेले असतात. पण अनेकांना या फीचर्सबद्दल माहितीच नसते. आज आम्ही तुम्हाला अशा फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल 90 टक्के लोकांना माहिती नाही. आपण कोणत्याही अ‍ॅपमध्ये लॉगइन करताना किंवा बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना आपल्याला एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. आपलं कामं झालं की आपण हा ओटीपी मॅन्यूअली डिलीट करत बसतो. पण आता असं करण्याची गरज नाही.

Motorola चा हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 50MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगने सुसज्ज

आज आम्ही तुम्हाला आपल्या स्मार्टफोनमधील अशी एक सेटिंग सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये आलेला कोणताही ओटीपी 24 तासांनंतर आपोआप डिलीट केला जाईल. स्मार्टफोनमधील या सेटिंगच्या मदतीने मदतीने फोनवर येणारा ओटीपी आपोआप डिलीट होईल. तुम्हाला ओटीटी शोधण्याची आणि त्यानंतर तो डिलीट करण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

खरं तर आपल्या स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या कोणत्याही ओटीपीची व्हॅलिडीटी किमान 10 ते 15 मिनिटांपर्यंतची असते. त्यानंतर या ओटीपीची आपल्याला काहीही आवश्यकता नसते. त्यामुळे आपलं काम झाल्यानंतर अनेकजण हा ओटीपी आपल्या स्मार्टफोनमधून डिलीट करतात. पण आपल्या स्मार्टफोनमध्ये इतके मॅसेज असतात, की आपल्याला शोधून हा ओटीपी डिलीट करावा लागतो. मात्र आता आम्ही तुम्हाला एक अशी सेटिंग सांगणार आहोत, ज्यामुळे ओटीपी आपोआप डिलीट केला जाईल.

ओटीपी

ओटीपीचा वापर वापरकर्त्याची ओळख पडताळण्यासाठी केला जातो. सहसा, ऑनलाइन खात्यांमध्ये लॉग इन करताना, ऑनलाइन व्यवहार करताना किंवा ऑनलाइन सेवा वापरताना ओटीपी पाठवला जातो. मॅसेजद्वारे ओटीपी पाठवला जातो. त्यानंतर वापरकर्त्याला ओटीपी डायल करून त्याची ओळख व्हेरिफाईड करावी लागते. अनेक वेळा फोनमध्ये अनेक ओटीपी जमा होतात. अशावेळी आपल्या फोनचे स्टोरेज भरते. मात्र आता ओटीपी आपोआप कसा हटवायचा याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ओटीपी आपोआप हटवण्याची पद्धत

  • ॲप उघडा – सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Messages ॲप उघडा.
  • प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा – ॲप ओपन केल्यानंतर, स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
  • मेनू उघडेल – त्यानंतर स्क्रीनवर एक पॉप-अप मेनू उघडेल.
  • येथे क्लिक करा – या मेनूमध्ये तुम्हाला Messages settings या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे क्लिक करा – यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपण सामान्य पर्यायावर क्लिक करा.
  • येथे क्लिक करा – यानंतर तुम्ही Messages organization पर्यायावर क्लिक करा.
  • चालू करा – येथे तुम्हाला Auto-delete OTPs after 24 hours चा पर्याय मिळेल. ते चालू करा.
तुमच्या स्मार्टफोनमधील Google Chrome सतत हँग होतोय का? फॉलो करा या 5 टिप्स आणि संपेल तुमची समस्या
  • चालू करा – वैशिष्ट्य सक्षम करण्यासाठी, त्याच्या समोर दिलेला टॉगल उजवीकडे स्लाइड करा.
  • सक्षम केले जाईल – यानंतर Auto-delete OTPs after 24 hours फीचर सक्षम होईल.
  • फायदा – यासह, 24 तासांनंतर OTP आपोआप डिलीट होईल.

Web Title: Tech tips how to delete otp automatically after 24 hours know the whole process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • otp
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.