Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! 'हे' 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय
अनेकांना स्वत:ला फिट ठेवणं आवडतं. अशा मित्रांसाठी स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड एक चांगला पर्याय ठरतो. 2 ते 3 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत एक चांगले स्मार्टवॉच खरेदी करू शकता.
स्मार्ट स्केल एका वेईंग मशीनप्रमाणे काम करते. यचामध्ये 5 ते 6 लोकांचा डेटा देखील सेव्ह केला जाऊ शकतो. तुमच्या आरोग्याप्रेमी मित्रांना तुम्ही स्मार्ट स्केल गिफ्ट करू शकता. सुमारे 1500 ते 2 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हे डिव्हाईस खरेदी करू शकता.
गाणी ऐकण, चित्रपट पाहणं आणि सतत कॉलवर बोलणाऱ्या मित्रांसाठी ईअरबड्स सर्वात चांगले गिफ्ट असू शकते. हे डिव्हाईस तुम्ही तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करू शकता.
मित्रांना गिफ्ट देण्यासाठी पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर देखील एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्ट गॅझेटची सुरुवातीची किंमत सुमारे 600 ते 700 रुपये असू शकते.
स्मार्टफोन आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण या स्मार्टफोनची बॅटरी संपली तर आपली सर्वच काम अडकतात. अशावेळी पावर बँक आपल्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांसाठी एक चांगला पावर बँक देखील खरेदी करू शकता.