Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

अनावश्यक कॉल्स आणि मेसेजला बसणार लगाम! ट्रायने एक महत्त्वाचे उचलले आहे. ट्रायने 1.24 लाख नंबरवर कारवाई केली आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान ट्रायकडे अनावश्यक व्यावसायिक संदेश आणि कॉल्सबाबत १५.२९ लाख तक्रारी दाखल झाल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2026 | 02:14 PM
स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • तीन महिन्यांच्या कालावधीत ट्रायने तब्बल १.२४ लाखांहून अधिक दूरसंचार संसाधनांवर कारवाई केली
  • वारंवार नियम मोडणाऱ्या १३ हजार ७७७ क्रमांकांचे कनेक्शन एक वर्षासाठी बंद करण्यात आले
  • लॉजिस्टिक्स, डिलिव्हरी आणि सार्वजनिक सेवा पुरवठादारांसाठी १६०१ ही स्वतंत्र मालिका सुरु
अनावश्यक जाहिरातींचे फोन आणि संदेश (स्पॅम कॉल्स व एसएमएस) यांना आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कठोर कारवाई सुरू केली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत ट्रायने तब्बल १.२४ लाखांहून अधिक दूरसंचार संसाधनांवर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७४ संस्थांना वर्षभरासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ट्रायच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील दुसऱ्या तिमाहीच्या अहवालानुसार, पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख १० हजार ३२५ मोबाइल क्रमांकांसह दूरसंचार संसाधनांच्या आउटगोइंग सेवा १५ दिवसांसाठी बंद करण्यात आल्या. वारंवार नियम मोडणाऱ्या १३ हजार ७७७ क्रमांकांचे कनेक्शन एक वर्षासाठी बंद करण्यात आले.

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

व्यावसायिक कॉलसाठी असेल स्वतंत्र क्रमांक

जाहिरातींचे कॉल आणि महत्त्वाचे सेवा संदेश यातील फरक ग्राहकांना समजावा, यासाठी ट्रायने स्वतंत्र क्रमांक मालिका निश्चित केली आहे. जाहिरातींच्या कॉलसाठी १४०, तर बँकिग, वित्तीय सेवा, विमा आणि सरकारी सेवांसाठी १६०० क्रमांक मालिका वापरली जाते. १० ऑगस्टपासून लॉजिस्टिक्स, डिलिव्हरी आणि सार्वजनिक सेवा पुरवठादारांसाठी १६०१ ही स्वतंत्र मालिका सुरू करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

तीन महिन्यांत १५.२९ लाख तक्रारी

जुलै ते सप्टेंबरदरम्यान ट्रायकडे अनावश्यक व्यावसायिक संदेश आणि कॉल्सबाबत १५.२९ लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ७.२३ लाख तक्रारी कारवाईस पात्र ठरल्या. यातील ९२.९ टक्के म्हणजेच १४.२१ लाख तक्रारी ट्रायच्या ‘डू नॉट डिस्टर्ब’ (डीएनडी) ॲपद्वारे प्राप्त झाल्या. सप्टेंबरअखेर या ॲपचे ४२.३६ लाख डाउनलोड झाले होते.

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

एआयने १९.९ अब्ज स्पॅम संदेश ओळखले

दूरसंचार कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणांच्या मदतीने १९.९ अब्ज संशयास्पद कॉल आणि संदेश ओळखले. यामध्ये १८.२८ अब्ज कॉल्स आणि १.६२ अब्ज एसएमएसचा समावेश आहे. स्पॅम पाठविण्याचा संशय असलेल्या संस्थांना ४५.९ लाखांहून अधिक इशारे देण्यात आले. केवायसी पडताळणीत अपयशी ठरलेल्या ९,९७७ कनेक्शनवरही कारवाई करण्यात आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: TRAI ने स्पॅम कॉल्स आणि मेसेजविरोधात कोणती कारवाई केली आहे?

    Ans: TRAI ने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यांत १.२४ लाखांहून अधिक टेलिकॉम संसाधनांवर कारवाई केली आहे. तसेच ३७४ संस्थांना एका वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केले आहे.

  • Que: स्पॅम कॉल करणाऱ्यांचा मोबाइल नंबर किती दिवसांसाठी बंद होऊ शकतो?

    Ans: पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१०,३२५ मोबाइल नंबरवरील आउटगोइंग सेवा १५ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या १३,७७७ नंबरचे कनेक्शन एका वर्षासाठी बंद करण्यात आले आहे.

  • Que: १४० नंबर सिरीज कशासाठी वापरली जाते?

    Ans: १४० नंबर सिरीजचा वापर जाहिराती आणि प्रमोशनल कॉल्ससाठी केला जातो.

Web Title: Trai takes strict action against spam calls and sms over 1 lakh 24 thousand telecom resources blocked hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • spam calls
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! ‘हे’ 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय
1

Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! ‘हे’ 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी
2

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

सावधान! घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा Wi-Fi ऑन ठेवताय? एक चूक अन् लीक होऊ शकतो वैयक्तिक डेटा
3

सावधान! घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा Wi-Fi ऑन ठेवताय? एक चूक अन् लीक होऊ शकतो वैयक्तिक डेटा

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
4

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.