Tech Tips: WhatsApp Calls रेकॉर्ड करायचे आहेत? 90 टक्के लोकांना माहीत नाही ही सोपी पद्धत
व्हॉट्सॲप आपण सर्वचजण वापरतो. व्हॉट्सॲपमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स देखील आहेत. व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ कॉल आणि व्हॉईस कॉल्स देखील करू शकता. हल्लीच व्हॉट्सॲपने व्हिडीओ कॉलिंगसाठी एक नवीन फीचर रोलआऊट केलं आहे. ज्यामध्ये युजर्स व्हिडीओ कॉलिंग दरम्यान वेगवेगळे फील्टर्स वापरू शकतात. व्हॉट्सॲपने मॅसेजिंगसोबतच कॉलिंगसाठी देखील अनेक वेगवेगळे फीचर्स रोलआऊट केले आहेत. हे सर्व फीचर्स युजर्सना प्रचंड फायद्याचे ठरतात.
तुमचं Instagram Account सस्पेंड झालंय? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने होईल रिकव्हर
व्हॉट्सॲप कॉलिंगसाठी वेगवेगळे फीचर्स रोल आऊट करण्यात आले असले तरी देखील युजर्सना एका समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्डिंग. वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपमध्ये व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंगचा पर्याय मिळत आहे, परंतु कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय ॲपमध्ये उपलब्ध नाही. काहीवेळा युजर्सना व्हॉट्सॲपवर कॉल रेकॉर्ड करावे लागतात, परंतु वैशिष्ट्याच्या अभावामुळे हे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत आता काय करायचं असा प्रश्न यूजर्सना पडतो. (फोटो सौजन्य – pinterest)
आता आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲप कॉल्स अगदी सहज रेकॉर्ड करू शकाल. मात्र, यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी ॲप वापरावे लागेल. व्हॉट्सॲपमध्ये कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा उपलब्ध नसली तरीही अनेक थर्ड पार्टी ॲप्स आहेत जे तुमचे काम सोपे करू शकतात.
हे ॲप्स तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही Cube ACR, Salestrail आणि ACR कॉल रेकॉर्डर सारख्या ॲप्सची मदत घेऊ शकता. व्हॉट्सॲप कॉल कशा प्रकारे रेकॉर्ड केले जाऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया.
व्हॉट्सॲप कॉल्सदरम्यान कोणताही स्कॅमर किंवा हॅकर तुमचे लोकेशन ट्रॅक करू नये, असे तुम्हालाही वाटत असेल, तर यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये ताबडतोब काही बदल करावे लागणार आहेत.
9 जानेवारीला लाँच होणार हा स्मार्टफोन, 6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 12GB रॅमचा सपोर्ट