तुमचं Instagram Account सस्पेंड झालंय? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने होईल रिकव्हर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी इंस्टाग्राम लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामचे करोडो युजर्स आहेत. इंस्टाग्राम आपल्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेऊन असते. जर आपल्याकडून कोणतीही चूक झाली किंवा आपण अशी एखादी पोस्ट किंवा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केली जी कम्युनिटी गाईडलाईन्सच्या बाहेर आहे, तर अशावेळी इंस्टाग्राम तुमचं अकाऊंट सस्पेंड करते. इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर घाबरण्याची गरज नाही, तुम्ही काही सोप्या पद्धतीने तुमचं सस्पेंड इंस्टाग्राम अकाऊंट रिकव्हर करू शकता.
Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग
असं अनेकवेळा होत की कोणत्यातरी कारणामुळे इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड केले जाते. पण आपलं इंस्टाग्राम अकाऊंट का सस्पेंड झालं आहे आणि ते कशा पद्धतीने रिकव्हर करायचं हे अनेकांना माहित नसतं. इंस्टाग्रामवर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर ते रिकव्हर करण्यासाठी आपल्याला इंस्टाग्रामकडे अपील करावे लागेल आणि हा पर्याय तुम्हाला ॲपवरच पाहायला मिळेल. तुमचे अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर ते रिकव्हर करण्यासाठी किती दिवस लागतील आणि ते कसे रिकव्हर करावे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर वेरिफिकेशन प्रोसेस दिसून येते. या प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी, यूजर्सना त्यांचा आयडी प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल. यासोबत तुमचे अकाउंट ज्या नंबरसोबत लिंक आहे तो नंबर पेस्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या नंबरवर ओटीपी येतो. ओटीपी टाकल्यानंतर ‘डन’ वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एक मेल येईल, ज्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म मिळेल. तुम्हाला मेलवर फॉर्म न मिळाल्यास तुम्ही तुम्ही स्वत: मेलला रिप्लाय करून सर्व माहिती देऊ शकता. तुमचे अकाऊंट रिकवर करण्यासाठी, तुम्ही 180 दिवसांच्या आत इंस्टाग्रामवर अपील करणे आवश्यक आहे. अपील करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
तुमचे अकाऊंट चुकून सस्पेंड झाले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही ॲपद्वारे ते दुरुस्त देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल. असे केल्याने तुमचे अकाऊंट आणि तक्रारीचेही रिव्यू केले जाऊ शकते.






