Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स

Apple AI Doctor: अ‍ॅपल त्यांच्या प्रीमियम डिव्हाइसेस आणि त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी लोकप्रिय आहे. आता कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर्स रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2025 | 07:45 PM
iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स

iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये iOS 19 अपडेट सादर करणार आहे. या अपडेटमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स सादर केले जाणार आहेत. ज्यामुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या अपडेटमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन AI फीचर्स देखील आणले जाणार आहे. इतर अ‍ॅप्सप्रमाणेच कंपनी AI फीचर्स त्यांच्या अ‍ॅपल हेल्थ अ‍ॅपसाठी देखील आणणार आहे. आगामी फीचर अ‍ॅपल हेल्थ अ‍ॅपसाठी एक मोठं अपडेट असणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी हेल्थ अ‍ॅपसाठी AI डॉक्टर फीचर सादर करणार आहे.

iOS 19 अपडेट युजर्ससाठी घेऊन येणार सरप्राईज, बदलणार iPhone चा लूक! काय असणार खास, जाणून घ्या

कंपनीच्या इतर फीचर्सप्रमाणेच हे फीचर्स देखील लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या, कंपनी अ‍ॅपल इकोसिस्टममध्ये AI वैशिष्ट्ये जोडण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या फीचर्सच्या मदतीन युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा, असा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठी आता नवीन अपडेट आणलं जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अ‍ॅपलच्या हेल्थ अ‍ॅपला मिळणार मोठं अपडेट

अ‍ॅपल त्यांच्या हेल्थ अ‍ॅपला AI सह मोठे अपग्रेड देण्याची तयारी करत आहे. या अ‍ॅपमध्ये हार्ट रेट मॉनिटर, ऑक्सिजन मॉनिटर (SPo2) आणि ECG सारख्या अनेक आरोग्य केंद्रित वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अ‍ॅपल त्यांच्या हेल्थ अ‍ॅपमध्ये AI इंटिग्रेटेड हेल्थ कोच आणण्याची तयारी करत आहे. त्याला AI डॉक्टर असेही म्हटले जात आहे. अ‍ॅपलच्या हेल्थ अ‍ॅपमध्ये उपलब्ध असलेले हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासंदर्भात सध्या प्रशिक्षण सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत या AI मॉडेलला प्रशिक्षण देत आहे. अ‍ॅपलने अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्समध्ये ईसीजी मॉनिटरिंग आणि फॉल डिटेक्शन ही हेल्थ ट्रॅकिंग वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत.

अ‍ॅपल हेल्थ अ‍ॅपमधील AI वैशिष्ट्ये

अ‍ॅपल हेल्थ अ‍ॅपमधील AI फीचर्स आगामी iOS 19 अपडेटसह सादर केले जातील. अ‍ॅपमधील AI हेल्थ कोच फीचर आयफोन, वॉच आणि इतर अ‍ॅपल डिव्हाईसमधील आरोग्य डेटाचे विश्लेषण करण्यास तसेच युजर्सना आरोग्य सल्ला देण्यास सक्षम असेल. जर अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर ते व्हर्च्युअल मेडिकल असिस्टंटसारखे काम करेल.

iPhone च्या कॅमेऱ्याचे हे 5 हिडन फीचर्स युजर्ससाठी ठरतायत वरदान! स्क्रीन ऑफ व्हिडीओ रेकॉर्डिंगसह करता येणार ही कामं

iOS 19 अपडेट कधी रिलीज होईल?

जूनमध्ये होणाऱ्या WWDC 2025 च्या वार्षिक डेव्हलपर कार्यक्रमात Apple iOS 19 ची घोषणा करू शकते . रिपोर्ट्सनुसार, कंपनी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये आयकॉन, मेनू, अ‍ॅप्स, विंडोज आणि सिस्टम बटणांचे डिझाइन पूर्णपणे बदलण्याची योजना आखत आहे. नवीन अपडेटनंतर आयफोन, आयपॅड, वॉच आणि मॅकचा इंटरफेस सारखाच असेल. कंपनीच्या मागील ट्रेंडवरून असे दिसून येते की ती गेल्या काही वर्षांपासून WWDC मध्ये आयफोन, आयपॅड आणि मॅकसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच करत आहे. या वर्षी हा कार्यक्रम 9 जून रोजी होणार आहे. कदाचित या आगामी कार्यक्रमात iOS 19 ची वैशिष्ट्ये उघड केली जाऊ शकतात.

Web Title: Tech tips ios 19 update apples ai doctor to care for your health with new health app features in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • AI technology
  • apple
  • Tech News

संबंधित बातम्या

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
1

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
2

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
3

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
4

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.