Tech Tips: Google Pay च्या या 5 स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला बनवतील एक्सपर्ट! आजच फॉलो करा
डिजीटल इंडियामध्ये आपण सुट्ट्या पैशांची कटकट संपवण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचा वापर करतो. किरकोळ दुकानदारांपासून अगदी मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचा वापर केला जातो. ऑनलाईन पेमेंटसाठी भारतात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay चा सर्वाधिक वापर केला जातो. तुम्ही देखील कपडे खरेदी करताना किंवा भाजी घेताना गुगल पेचा वापर करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका
गुगल पेच्या मदतीने पेमेंट कसं करावं हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण अशा काही स्मार्ट ट्रिक्स आहेत, ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. या स्मार्ट ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही गुगल पेचे एक्सपर्ट बनू शकता. चला तर मग गुगल पे च्या या स्मार्ट ट्रिक्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Pay मध्ये मित्र आणि कुटूंबासोबत बिल स्प्लिट करण्यासाठी एक खास फीचर देण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही एक ग्रुप तयार करू शकता, या ग्रुपमध्ये तुम्ही अशा लोकांना जोडू शकता ज्या लोकांमध्ये बिल स्प्लिट करायचं आहे. बिल स्प्लिट करताना केवळ लक्षात ठेवा की, बिल कोणी भरलं आहे. आता या फीचरच्या मदतीने कोणी कोणी पैसे दिले आहेत, हे ट्रॅक केलं जाऊ शकतं.
तुमच्या प्रत्येक पेमेंटवर तुम्हाला गुगल पेकडून रिवॉर्ड दिला जाईल असं नाही. पण काही ट्रांजेक्शन असे असतात जिथे तुम्हाला जबरदस्त स्क्रॅच कार्ड अनलॉक करण्याची संधी मिळते. फोन रिचार्ज किंवा विजेच्या बिल यांसारख्या यूटिलिटी पेमेंटवर सर्वाधिक रिवॉर्ड कार्ड मिळतात. या स्क्रॅच कार्डसोबत तुम्ही पार्टनर ब्रँडकडून कॅशबॅक किंवा प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळवू शकता. तुम्ही गुगल पे ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला रिवॉर्ड ऑप्शन पाहायला मिळेल.
तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का की जे त्यांच्या आवडत्या सब्सक्रिप्शनसाठी पेमेंट करणं विसरून जातात? अशावेळी तुम्हा गुगल पेचं ऑटोपे फीचर वापरू शकता. इथे तुम्हाला JioCinema, Netflix, Spotify, यूट्यूब प्रीमियमसह अनेक अॅप्ससाठी ऑटोपे ऑप्शन पाहायला मिळेल.
India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना
गुगल पेच्या मदतीने तुम्ही अगदी सहज बँक बॅलेंस चेक करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या कोणत्याही वेबसाईट किंवा अॅपवर लॉगिन करण्याची गरज नाही. हे फीचर अगदी छोटं आहे, पण खूप फायद्याचं आहे. तुम्ही इथे तुमचा UPI पिन एंटर करून बँक बॅलेंस चेक करू शकता.
तुम्ही पेमेंटसाठी कस्टम नोट किंवा लेबल अॅड करू शकता. म्हणजेच जेव्हा महिन्याचा हिशोब केला जाईल, तेव्हा कुठे किती पैसे खर्च झाले हे तुम्हाला समजू शकेल.