Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका
तुम्ही सॅमसंग प्रेमी आहात का? तुम्ही सॅमसंगचा नवीन प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्ससह सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. ही बेस्ट ऑफर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही ऑफर बेस्ट आहे.
Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध
अॅमेझॉनवर Samsung Galaxy S25 Ultra 5G स्मार्टफोन तब्बल 28,649 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर उपलब्ध आहेत. चला तर मग स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगचा हा प्रिमियम स्मार्टफोन सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट वर 1,29,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 1,06,350 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर प्लॅट 23649 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. जर तुम्ही EMI ट्रांजेक्शनसाठी HDFC बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5000 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर एकूण 28,649 रुपयांचं डिस्काउंट दिलं जात आहे.
कंपनी या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफरसह एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक बचत करू शकता. स्मार्टफोनवर 61000 रुपयांपर्यंत एक्सचेंज वॅल्यू दिली जात आहे. स्मार्टफोनची एक्सचेंज वॅल्यू तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर आधारित आहे. तुमचा जुना स्मार्टफोन जितका चांगला असेल तुम्हाला तितकी एक्सचेंज वॅल्यू दिली जाईल.
सॅमसंग गॅलेक्सी S25 मध्ये टाइटेनियम फ्रेम डिजाइन देण्यात आली आहे. यासोबतच डिव्हाइस 2600 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.9 इंचाचा डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये गोरिल्ला ग्लास आर्मर 2 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.
या स्मार्टफोनमध्ये दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये लाईव्ह लाइव ट्रांसलेट पासून सर्किल टू सर्च सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्राइड 15 वर बेस्ड One UI7 सह येतो.
स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसरवाला कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच डिवाइसमध्ये 5x झूमसह 50MP चा पेरिस्कोप लेंस, 10MP चा टेलीफोटो आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.