India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सुरु असलेल्या संघर्षाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. सोशल मीडिया पेजेसवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. या पोस्ट मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड देखील केल्या जात आहेत. यामुळे अफवा पसरत आहेत. शिवाय सततच्या फेक पोस्ट आणि खोट्या व्हिडीओंमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आयटी मंत्रालयाने भारतीयांसाठी अॅडवायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये सोशल मीडिया युजर्ससाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने नागरिकांना काय करावे आणि काय करू नये, याची एक यादी दिली आहे. एक्सवर पोस्ट करत ही अॅडवायझरी जारी करण्यात आली आहे. याचा उद्देश लोकांनी सायबर सूरक्षा आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांबाबत सावध राहणं हा आहे. पोस्टमध्ये काय सांगितलं आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Critical Online Safety Alert always follow cybersecurity precautions. Stay cautious while online—don’t fall for traps or misinformation. Be patriotic, stay vigilant, stay safe.#Digitalindia #OperationSindoor pic.twitter.com/IIRKGzsh27
— Ministry of Electronics & IT (@GoI_MeitY) May 9, 2025
खोट्या पोस्ट आणि बातम्यांची तक्रार करण्यासाठी WhatsApp नंबर: +91 8799711259 किंवा ईमेल: socialmedia@pib.gov.in यांचा वापर करा.