
iPhone Air 2 लाँचिंगबाबत निर्माण झाला संभ्रम! कंपनीचा या प्रोडक्ट्सवर सर्वात जास्त फोकस, जाणून घ्या सविस्तर
टेक कंपनी Apple ने अलीकडेच त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने त्यांचा ऑल न्यू iPhone Air देखील लाँच केला आहे. iPhone Air हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आहे. हा आयफोन त्याच्या डिझाईनमुळे लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. मात्र कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे या आयफोन मॉडेलची विक्री झाली नाही. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे या मॉडेलची बॅटरी लाईफ आणि कॅमेरा फीचर्स.
200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स
लोकांनी iPhone Air च्या डिझाईनला जरी पसंती दर्शवली असली तरी देखील आयफोनची बॅटरी आणि कॅमेऱ्याने लोकांना तितके खूश केले नाही. त्यामुळे iPhone Air नंतर अनेकांना iPhone Air 2 ची प्रतिक्षा लागली आहे. iPhone Air 2 हा 2026 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता होती. मात्र आता कंपनीने त्यांचा निर्णय बदलला आहे. iPhone Air च्या खराब विक्रीमुळे कंपनी त्यांच्या नेक्स्ट-जेनरेशन iPhone Air लाँचिंगला आणखी काही काळ लावू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
द इंफॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार कंपनीने सध्या उपलब्ध असलेल्या iPhone Air चे प्रोडक्शन अत्यंत कमी केले आहे. हा सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेला कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन मॉडेल आहे. iPhone Air ची सर्वात जास्त विक्री होईल आणि कंपनीला नफा होईल, अशी Apple ला आशा होती, कारण कंपनीने या आयफोन मॉडेलमध्ये सुपर-स्लिम आणि हलके डिझाईन दिले होते. मात्र लोकांनी या मॉडेलला तितकी पसंती दर्शवली नाही.
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, Apple च्या पुढील ईव्हेंटमध्ये iPhone Air 2 लाँच करण्याचा अजूनही कोणता प्लॅन नाही. iPhone Air 2 ऐवजी कंपनी 2026 मध्ये लाँच केल्या जाणाऱ्या मुख्य दोन प्रोडक्ट्सवर सध्या फोकस करत आहे. हे दोन प्रोडक्ट्स म्हणजे iPhone 18 Pro आणि Apple चा पहिला फोल्डेबल iPhone असणार आहेत. स्टँडर्ड iPhone 18 आणि एक नवीन बजेट-फ्रेंडली iPhone 18E कदाचित 2027 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोतणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Apple आगामी iPhone Air 2 हा 2027 मध्ये लाँच करेल, अशी दाट शक्यता आहे.
रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगितलं आहे की, Apple च्या iPhone Air 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर आणि 48MP चा अल्ट्रा-वाइड लेंस यांचा समावेश आहे. हे अपग्रेड असूनही, अहवाल असे सूचित करतात की कॅमेरे हॉरिजॉन्टल लेआउटमध्ये राहतील, अलिकडच्या आयफोनमध्ये दिसणाऱ्या उभ्या डिझाइनपेक्षा वेगळे असेल.
Ans: Apple चा A17 Bionic किंवा A18 चिपसेट (मॉडेलनुसार) वापरला आहे.
Ans: iPhone Air हा Apple कंपनीचा हलका आणि आकर्षक डिझाईन असलेला प्रीमियम स्मार्टफोन मॉडेल आहे.
Ans: हा मॉडेल पारंपरिक iPhones पेक्षा हलका आहे — अंदाजे 160–170 ग्रॅम (मॉडेलनुसार बदलू शकते).