NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest' स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान
देशभरात डिजीटल अरेस्टच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक अलर्ट जारी केला आहे. NPCI ने लोकांना विनंती केली आहे की, अनोळखी नंबरवरून आलेले कॉल्स उचलणं टाळा. अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण हे असे कॉल्स आणि मेसेज लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाणारी नवीन पद्धत आहे. लोकांना घाबरवून आणि त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करून फसवणूक करणे, असा सायबर गुन्हेगारांचा उद्देश असतो. यासाठीच आता NPCI ने काही महत्त्वाचे अलर्ट जारी केले आहेत, ज्यामुळे लोकांची सुरक्षा कायम राहिल.
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार लोकांना फोन करतात आणि आपण पोलीस, CBI, इनकम टॅक्स किंवा कस्टम विभाग अधिकारी असल्याचे भासवतात. त्यानंतर गुन्हेगार लोकांवर खोटे आरोप करतात आणि त्यांना कायदेशीर कारवाईत अडकवण्याची धमकी देतात. यानंतर अनेक लोकं घाबरून या गुन्हेगारांना पैसे देतात आणि सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या आदेशाचे पालन करतात. अनेकदा सायबर गुन्हेगार स्वत:ला खरं सिद्ध करण्यासाठी सरकारी एजेंसीच्या लोकांचा आणि बनवाट ओळखपत्राचा वापर करतात. AI वॉइस आणि बॅकग्राउंड साउंड्सच्या मदतीने कॉल खरा असल्याचे भासवले जाते. यानंतर डिजिटल अरेस्टचा संपूर्ण ड्रामा सुरु होतो. सायबर गुन्हेगार कॅमेरा चालू ठेऊन संबंधित व्यक्तीला सांगतात की तुम्ही पोलीस कस्टडीमध्ये आहात. यानंतर लोकं घाबरतात आणि सायबर गुन्हेगारांच्या सर्व आदेशांचे पालन करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
NPCI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणतीही सरकारी एजेंसी लोकांकडून फोनवर पैशांची मागणी करत नाही. सरकारी एजेंसी कोणत्याही लोकांना व्हिडीओ कॉल किंवा चॅटवर डिजीटल अरेस्ट करत नाही. जर तुम्हाला असा एखादा फोन आला किंवा व्हॉट्सअॅप मेसेज आला, तर योग्य ती पाऊलं उचलणं अत्यंत गरेजचं आहे. अन्यथा तुम्ही डिजीटल अरेस्टच्या जाळ्यात अडकू शकता.
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांची सर्वात मोठी ताकद म्हणजे लोकांची भिती. ते प्रथम त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देतात आणि नंतर केस मिटवण्याच्या नावाखाली पैशाची मागणी करतात. ही भीती आणि घाई लोक या फसवणूक करणाऱ्यांना बळी पडण्यास प्रवृत्त करते. NPCI ने लोकांना विनंती केली आहे की, कोणत्याही परिस्थितीत तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांसोबत शेअर करू नका.
Ans: डिजीटल अरेस्ट हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे ज्यात फसवे लोक स्वतःला पोलिस, सीबीआय, किंवा सरकारी अधिकारी म्हणून दाखवून नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवतात.
Ans: भारत सरकारच्या CERT-In वेबसाइटवर (https://www.cert-in.org.in ) किंवा सायबरक्राईम.gov.in पोर्टलवर सायबर अलर्ट्स आणि सुरक्षा सूचना पाहू शकता.
Ans: कारण कायद्याने अटक करण्यासाठी फक्त प्रत्यक्ष पोलिस अधिकारी आणि अधिकृत वॉरंट आवश्यक असते. ऑनलाईन अटक ही फक्त फसवणूक आहे.






