
Apple ने लाँच केलं iPhone Pocket! आता कुठेही घेऊन जा तुमचा महागडा फोन, किंमत आहे केवळ इतकी
Apple ने जापानचे फॅशन हाऊस Issey Miyake सोबत पार्टनरशिप केल्याची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपनंतर कंपनीने आयफोन युजर्ससाठी एक खास प्रॉडक्ट लाँच केला आहे. कंपनीने त्यांच हे नवीन प्रोडक्ट iPhone Pocket नावाने लाँच केलं आहे. हे एक लिमिटेड-एडिशन 3D-निट एक्सेसरी आहे. हे प्रोडक्ट iPhone, AirPods आणि दूसरे छोटे एसेंशियल्स एकसाथ ठेवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ‘अ पीस ऑफ क्लॉथ’ कॉन्सेप्टपासून इंस्पायर्ड हे iPhone Pocket टेक्नोलॉजी आणि क्राफ्ट्समॅनशिप चे एक उत्तम कॉम्बिनेशन उदाहरण आहे. हे प्रोडक्ट सिंपलिटी आणि डिझाईन फिलॉसफी दर्शवते. याचे रिब्ड आणि फ्लेक्सिबल डिझाईन आयफोन अगदी सुरक्षितपणे गुंडाळते आणि यामध्ये स्क्रिन अगदी हलकी दिसते. यामुळे डिव्हाईस कुठेही सहजपणे घेऊन जाण्याची एक नवीन पद्धत समोर आली आहे.
Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज
iPhone Pocket च्या शॉर्ट स्ट्रॅप वर्जनची किंमत $149.95 म्हणजेच सुमारे 13,300 रुपये ठेवण्यात आली आहे. हे प्रोडक्ट लेमन, मैंडरिन, पर्पल, पिंक, पीकॉक, सैफायर, सिनामन आणि ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. याचे लॉन्ग क्रॉसबॉडी वर्जन $229.95 म्हणजेच सुमारे 20,400 रुपयांत लाँच करण्यात आले आहे. हे प्रोडक्ट पीकॉक, सैफायर, सिनामन आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वर्जन सर्व मॉडेल्ससह कम्पॅटिबल आहे. (फोटो सौजन्य – X)
iPhone Pocket ची विक्री शुक्रवारी 14 नोव्हेंबरपासून निवडक Apple Store लोकेशन्स आणि Apple च्या ऑफिशियल वेबसाईटवर सुरु होणार आहे. ही एक्सेसरी अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, इटली, जापान, दक्षिण कोरिया, सिंगापुर, ग्रेटर चाइनासह अनेक मार्केट्समध्ये उपलब्ध असणार आहे.
जपानमध्ये तयार करण्यात आलेला iPhone Pocket 3D-निटेड रिब्ड टेक्सचरसह लाँच करण्यात आले आहे. जे Issey Miyake च्या सिग्नेचर ‘Pleats’ डिझाईनने प्रेरित आहे. याचे डिझाईन स्ट्रेचेबल आहे, ज्यामुळे हे प्रोडक्ट iPhone सह छोटं सामान जसं चाव्या किंवा कार्ड्स ठेवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. याला हँडहेल्ड, बॅग्सने जोडून कॅरी केले जाऊ शकते. म्हणजेच हे एक फंक्शनल एक्सेसरीसह फॅशन स्टेटमेंट देखील आहे.
Issey Miyake चे डिझाईन डायरेक्टर Yoshiyuki Miyamae यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रोडक्ट आपल्या पद्धतीने आयफोन कॅरी करण्याचा आनंद एक्सप्लोर करतो, जे इंडिविजुअलिटी आणि डेली यूजवर लक्ष देते. तसेच, Apple चे वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडस्ट्रियल डिजाइन Molly Anderson यांनी सांगितलं आहे की, हे कोलॅबोरेशन ‘क्राफ्ट्समॅनशिप, सिंपलिटी आणि डिलाइट’ चा उत्सव आहे. याचे कलर पॅलेट विशेषत: आयफोन मॉडेल्ससह मॅच करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
Ans: तुम्ही iCloud किंवा iTunes च्या मदतीने पूर्ण डेटा बॅकअप घेऊ शकता.
Ans: भारतातील तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील फॅक्टरीजमध्ये काही मॉडेल्सचे उत्पादन केले जाते.
Ans: सध्या iPhone 15, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे लोकप्रिय मॉडेल्स आहेत.