Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज
Apple ने यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. कंपनीने या सिरीजमधील मॉडेल्स अनेक वेगवेगळ्या रंगात लाँच केले होते. पण या सर्व रंगांमध्ये एक असा रंग होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. Apple ने iPhone 17 Pro मॉडेल कॉस्मिक ऑरेंज कलर व्हेरिअंटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला. या मॉडेलने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. या कलर व्हेरिअंटची लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. याला भारतात भगवा रंग देखील म्हटलं जात आहे. या रंगासाठी लोकांची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली.
आयफोननंतर आता सॅमसंगने देखील या शर्यतीत उडी घेतली आहे. कंपनी Samsung Galaxy S26 सीरीज कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या लीक्समध्ये या स्मार्टफोन सिरीजचा ऑरेंज कलर व्हेरिअंट लिस्ट करण्यात आला आहे. हा कलर व्हेरिअंट लाँच होण्यापूर्वीच त्याचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tipster OnLeaks आणि पॉपुलर टेक पब्लिकेशन Android Headlines ने Samsung Galaxy S26 Plus च्या रेंडर्ड इमेज शेअर केल्या आहेत. यामध्ये स्मार्टफोनचे डिझाईन फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही बाजूने दिसत आहे. रियर पॅनल बऱ्यापैकी Galaxy S25 Edge आणि Galaxy Z Fold 7 सारखे दिसत आहेत. ज्यामध्ये ग्रुप्ड कॅमेरा लेन्स आणि डबल-लेयर्ड कॅमेरा आयलंडचा समावेश आहे.
फ्रंटला, स्मार्टफोन Galaxy S25 Plus मॉडेलसारखीच वैशिष्ट्ये राखून ठेवते. रेंडर्सच्या आधारवर या आगामी स्मार्टफोनची काही माहिती शेअर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy S26 Plus या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, मात्र या डिव्हाईसमध्ये सर्वात पातळ बेजल्स दिले जाऊ शकतात. डायमेंशन्सबद्दल बोलायचं झालं तर, 158.4 x 75.7 x 7.35mm असा स्मार्टफोनचा आकार असणार आहे. रंग प्रकारांबद्दल, रेंडरमध्ये सॅमसंग S-सिरीज फोन नारंगी रंगात लाँच करेल की नाही याबद्दल कोणतीही निश्चित माहिती दिलेली नाही. हे डिझाइन इमेजेस केवळ लाँचच्या वेळी आपल्याला काय दिसेल याचे प्रतिनिधित्व करतात.
200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S26 Plus मध्ये 6.7-इंच Quad HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Snapdragon 8 Elite Gen 5 किंवा Exynos 2600 ने सुसज्ज असणार आहे, जे प्रदेशावर अवलंबून असेल आणि त्यात 12 जीबी रॅम असू शकते. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा , 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12MP टेलीफोटो लेंस समाविष्ट असणार आहे, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल जूम मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4900mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.






