
सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips
CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, हे दोष Android 13, 14, 15 आणि 16 वर्जन्सवर परिणाम करू शकतात. म्हणजेच सुमारे सर्वच मॉर्डन अँड्रॉईड स्मार्टफोन्ससाठी धोका निर्माण झाला आहे. यामध्ये Samsung, OnePlus, Xiaomi, Realme, Motorola, Vivo, Oppo आणि Google Pixel सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. स्मार्टफोन्समध्ये आढळलेल्या या सिक्योरिटी दोषचा संंबंध, Qualcomm, MediaTek, NVIDIA, Broadcom आणि UNISOC सारख्या कंपन्यांद्वारे डेव्हलप करण्यात आलेल्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर कंपोनेंट्ससोबत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे कंपोनेंट्सचा वापर Android फोन्स, टॅबलेट्स आणि वियरेबल्ससाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. CERT-In ने सांगितलं आहे की, या भेद्यता Google च्या नोव्हेंबर 2025 च्या Android सुरक्षा बुलेटिनमध्ये सूचीबद्ध केलेल्या विक्रेता-विशिष्ट घटकांशी संबंधित आहेत. स्मार्टफोन्समध्ये आढळलेल्या या दोषांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, ज्यामुळे हॅकर्सना डिव्हाईसचा एडमिनिस्ट्रेटिव एक्सेस मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हॅकर्स मालवेयर इंस्टॉल, पर्सनल डेटा चोरी आणि डिव्हाईस क्रॅश सारख्या घटना घडवू शकतात.
CERT-In ने हा मुद्दा हाय-रिस्क कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. याशिवाय युजर्सना चेतावणी देखील देण्यात आली आहे की, या फ्लॉजद्वारे अनऑथोराइज्ड यूजर्स संवेदनशील माहिती, बँकिंग डिटेल्स, क्लाउड अकाउंट्सपर्यंत पोहोचवू शकतात किंवा संपूर्ण सिस्टम कंट्रोल करू शकतात. ज्या डिव्हाईसमध्ये लेटेस्ट सिक्योरिटी पॅच इंस्टॉल केलेला नाही, त्या युजर्सवर या अटॅकचा सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केवळ स्मार्टफोन्सचं नाही तर या सायबर अटॅकचा परिणाम Smart TVs आणि IoT डिव्हाईसवर देखील होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
Ans: Android ओपन-सोर्स आहे आणि विविध ब्रँडच्या फोनमध्ये वापरले जाते, तर iOS फक्त Apple च्या iPhone मध्ये वापरले जाते.
Ans: 2025 मध्ये Android ची नवीनतम आवृत्ती Android 15 आहे, ज्यात अधिक सुरक्षा आणि AI-आधारित फीचर्स आहेत.
Ans: Samsung, Realme, Xiaomi, OnePlus, Vivo, Oppo, Motorola, आणि Google Pixel हे प्रमुख Android स्मार्टफोन ब्रँड आहेत.