
iOS-Android वरील Chrome मध्ये आलं नवीन 'AI मोड' बटन, हे आहेत खास फीचर्स! आता युजर्सना होणार फायदाच फायदा
Google क्रोम युजर्ससाठी एक आनंदाची आणि फायद्याची बातमी आहे. Google ने त्यांच्या iPhone आणि Android यूजर्ससाठी क्रोम बाऊझरचे एक नवीन अपडेट सादर केले आहे. युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला व्हावा, यासाठी गुगलने हे नवीन अपडेट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे हे नवीन अपडेट AI संबंधित आहे. हे नवीन अपडेट नक्की काय आहे आणि त्याचा युजर्सना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, या नवीन अपडेटचे फीचर्स नक्की काय आहेत, या सर्वांबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अॅक्सेसरीज
Google ने त्यांच्या क्रोम ब्राऊझरमध्ये नवीन ‘AI Mode’ बटण जोडले आहे. हे नवीन अपडेट iPhone आणि Android यूजर्ससाठी सादर करण्यात आलं आहे. मोबाईल फंक्शनॅलिटीला डेस्कटॉप वर्जनच्या बरोबरीने कार्य करता यावे, यासाठी हे नवीन फीचर सादर करण्यात आलं आहे. हे फीचर Google सर्च बारच्या अगदी खाली आणि Incognito Mode आयकॉनच्या जवळ असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना कोणत्याही मेन्यू किंवा सेटिंग्समध्ये जाण्याची गरज नाही. युजर्स थेट क्रोम ब्राऊझर ओपन करून Google च्या अॅडवांस्ड AI फीचर्सचा वापर करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
AI Mode बटन यूजर्सना Chrome च्या Gemini-पावर्ड AI सर्च टूलचा थेट अॅक्सेस देते. ज्यामुळे यूजर्स अधिक जटिल आणि संभाषणात्मक प्रश्नांची उत्तरं शोधू शकतात. स्टँडर्ड सर्च विपरीत, Gemini मल्टी-पार्ट प्रश्नांना अगदी सहज समजून घेते, कॉन्टेक्स्ट इंटरप्रेट करू शकते आणि मागील प्रश्नांच्या आधारावर पुढील माहिती देखील देऊ शकते. हे फीचर विशेषत: रिसर्च, ट्रॅवल प्लॅनिंग किंवा ट्रबलशूटिंग टास्क्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. उदाहरणार्थ, यूजर नेचुरल भाषेत फॉलो-अप प्रश्न विचारू शकतात किंवा रिजल्ट रिफाइन करू शकतात, ज्यामुळे Chrome केवळ एक ब्राऊझर नाही तर एका इंटेलिजेंट असिस्टेंटप्रमाणे काम करतो.
Google ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सर्च आणि कन्वर्सेशन यांच्यामध्ये असलेले अंतर नष्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे युजर्स अधिक सोप्या आणि वेगवान पद्धतीने माहिती शोधू शकतात. हे ऑन-डिवाइस आणि क्लाउड-बेस्ड AI कॅपेबिलिटीजचा वापर करतात, ज्यामुळे उत्तरं अधिक सटीक आणि एफिशिएंटली मिळू शकतील. क्रोममध्ये Gemini चे एकत्रीकरण Google च्या संपूर्ण इकोसिस्टममध्ये जनरेटिव्ह एआय टूल्स समाविष्ट करण्याच्या मोठ्या ध्येयाचा एक भाग आहे. जसे जीमेल, डॉक्स आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम.
सध्या, AI Mode बटण iPhone, iPad आणि Android डिव्हाइससाठी अमेरिकेत रोलआऊट करण्यात आले आहे. येत्या काही आठवड्यात हे फीचर ग्लोबली एक्सपांड केले जाणार आहे. अमेरिकेबाहेरील यूजर्सना प्रादेशिक उपलब्धतेसाठी थोडी वाट पहावी लागू शकते, कारण Google अजूनही अनुभव सुधारण्यासाठी आणि स्थानिक डेटा धोरणांशी जुळवून घेण्यावर काम करत आहे.
Ans: Chrome Windows, macOS, Android, iOS आणि Linux या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
Ans: इन्कॉग्निटो मोडमध्ये ब्राउझिंग हिस्ट्री, कुकीज आणि साइट डेटा जतन होत नाही, त्यामुळे प्रायव्हसी वाढते.
Ans: एक्स्टेंशन्स हे छोटे टूल्स आहेत जे Chrome मध्ये अतिरिक्त फीचर्स देतात — जसे की Ad Blocker, Grammarly, Dark Mode इत्यादी.