iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर
Apple चे आगामी मॉडेल्स कधी लाँच होणार, त्यामध्ये कोणत्या फीचर्सचा समावेश असणार, याबाबत युजर्समध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. आता आगामी सिरीजमधील एका मॉडेलबाबत माहिती समोर आली आहे. Apple चा नवीन iPhone Air, स्मार्टफोन त्याच्या स्लिम डिझाईनमुळे चर्चेत आहे. आता या मॉडेलचे नवीन वर्जन लाँच केले जाणार आहे. कंपनी सध्या iPhone 18 Air च्या लाँचिंगची तयारी करत आहे. या आयफोन मॉडेलची लाँच डेट अद्यार जाहीर करण्यात आली नाही. याबाबत घोषणा होण्यापूर्वीच iPhone 18 Air चे काही लिक्स समोर आले आहे. या लिक्समध्ये iPhone 18 Air च्या काही फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.
टेक टिप्स्टर Digital Chat Station ने दिलेल्या महितीनवुसार, आगामी iPhone Air म्हणजेच iPhone 18 Air मध्ये दोन 48MP कॅमेरे दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये एक मेन सेंसर आणि एक अल्ट्रावाइड लेंस असू शकतो. हा बदल अशा युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना मोबाईल फोटोग्राफीची आवड आणि त्यासाठी स्लिम डिझाईनला प्राधान्य देतात. याशिवाय लीक्समध्ये एक कॉन्सेप्ट इमेज देखील शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन iPhone Air मागील मॉडेलसारखा दिसत आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक अतिरिक्त लेंस जोडली गेली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
The iPhone Air 2 next year could reportedly feature two rear cameras 🚨 A new 48MP ultra wide camera could join the existing 48MP main camera Source: Digital Chat Station (Weibo) pic.twitter.com/sEekuTda50 — Apple Hub (@theapplehub) November 6, 2025
रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, Apple अजुनही अल्ट्रा-स्लिम डिझाईनवर फोकस करत आहे. आधीच्या मॉडेलची जाडी केवळ 5.6mm होती आणि नवीन मॉडेल देखील याच रेंजमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन आयफोन एअर मॉडेलच्या इतर फीचर्स देखील माहिती समोर आली आहे.
असं सांगितलं जात आहे की, नवीन iPhone Air मध्ये 6.5-इंच OLED ProMotion डिस्प्ले, Face ID सपोर्ट, आणि नवीन A20 Pro चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आगामी आयफोनचा परफॉर्मंस आणि बॅटरी एफिशिएंसी दोन्ही अधिक चांगली राहणार आहे. याशिवाय हा फोन eSIM-only मॉडेल असण्याची शक्यता आहे. म्हणजेच या फोनमध्ये फिजिकल सिम स्लॉट जिला जाणार नाही.
लीकनुसार, iPhone 18 Air ला Apple त्यांच्या 2026 लाइनअपमध्ये समाविष्ट करणार आहे. यासोबतच कंपनी या सिरीजमध्ये iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि कंपनीचा पहिला फोल्डेबल iPhone देखील लाँच करणार आहे. हे सर्व मॉडेल्स सप्टेंबर 2026 मध्ये लाँच केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बेस मॉडल iPhone 18 आणि बजेट वर्जन iPhone 18e हा 2026 किंवा 2027 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 18 Air ची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 1,19,900 रुपये असण्याची शक्यता आहे, म्हणजेच Apple तो गेल्या वर्षीच्याच किमतीत लाँच करू शकते.
Ans: Apple कंपनी 2026 मध्ये iPhone 18 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे.
Ans: नवीन A19 Bionic चिपसेट वापरला जाईल, जो अधिक शक्तिशाली आणि ऊर्जा-बचत करणारा असेल.
Ans: होय, Apple चे नवीन Apple Intelligence (AI) फीचर्स Siri, Photos आणि Messages मध्ये खोलवर समाविष्ट केले जातील.






