
Realme ने भारतात लाँच केला Aston Martin F1 लिमिटेड एडिशन 5G फोन, 7,000mAh बॅटरीसह मिळणार हे धमाकेदार फीचर्स
Realme ने त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Realme GT 8 Pro Aston Martin F1 Edition या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा एक 5G फोन आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये स्टँडर्ड Realme GT 8 Pro सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा नवीन स्मार्टफोन डिझाईनच्या बाबतीत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा अत्यंत वेगळा आहे.
एवढंच नाही तर हा नवीन स्मार्टफोन एका खास कस्टम-डिजाइन बॉक्समध्ये दिला जातो, ज्यामध्ये एस्टन मार्टिन-थीमवाला फोन केस आणि रेस कारच्या आकाराचे सिम इजेक्टर टूल सारख्या काही एक्सक्लूसिव एक्सेसरीज देखील देण्यात आले आहेत. याशिवाय या फोनमध्ये F1 चे वॉलपेपर आणि कॅमेरा वॉटरमार्क देखील पाहायला मिळत आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये देखील लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेट आणि 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme GT 8 Pro Aston Martin F1 Edition हा स्मार्टफोन चीनमध्ये एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 16GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 5,499 म्हणजेच सुमारे 68,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, स्टँडर्ड Realme GT 8 Pro च्या 16GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,199 म्हणजेच सुमारे 64,000 रुपये ठेवण्यात आली आहे. Realme GT 8 Pro हा स्मार्टफोन येत्या काहीच दिवसांत म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. अशी देखील शक्यता आहे की, Realme GT 8 Pro Aston Martin F1 Limited Edition देखील स्टँडर्ड मॉडेलसह भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये UI 7.0 पाहायला मिळत आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.79-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट दिला आहे. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यासोबतच या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रिकोह GR एंटी-ग्लेयर प्रायमरी कॅमेरा , 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस आणि 200-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये पुढील बाजूस सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.