Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! 'या' रिचार्जची किंमत वाढली, 'हा' प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Bharti Airtel ने त्यांच्या युजर्सना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने त्यांचा एक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. तर याच रिचार्ज प्लॅनचा एक नवीन एंट्री लेव्हल प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत आधीच्या प्लॅनपेक्षा जास्त आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सना मोठा झटका बसला आहे. युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा आणि जास्तीचे फायदे वापरता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी बेसिक अनलिमिटेड प्लॅनची सुरुवातीची किंमत वाढवली आहे. आधी हा प्लॅन 189 रुपयांनी सुरु व्हायचा. मात्र आता हा प्लॅन बंद करून कंपनीने एक नवीन एंट्री-लेवल अनलिमिटेड प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 199 रुपये आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे, ज्यांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, SMS आणि बेसिक डेटाची सुविधा पाहिजे. कंपनीने त्यांचा हा प्लॅन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. जसे डेटा सेंट्रिक, व्हॉईस सेंट्रिक, आणि व्हॉईस व एसएमएस ओनली वेरिएंट्स. (फोटो सौजन्य – Pinterest)
Airtel चा नवीन 199 रुपयांचा प्लॅन आता सर्वात स्वस्त ट्रूली अनलिमिटेड प्लॅन बनला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनेक जबरदस्त फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स देशभरात कुठेही कॉल करू शकतात. यासोबतच या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील फ्री मिळतात. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो, ज्याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. जर यूजरने डेटा मर्यादा ओलांडली तर त्याला प्रति MB 50 पैसे दराने शुल्क आकारले जाईल.
याशिवाय या प्लॅनमध्ये कंपनी काही एक्सक्लूसिव रिवार्ड्स देखील ऑफर करत आहे. यूजर्सना प्रत्येक 30 दिवसांत एक फ्री HelloTune सेट करण्याची सुविधा ऑफर केली जाणार आहे. याशिवाय, कंपनी Perplexity Pro AI Subscription देत आहे. ज्याची किंमत 17,000 रुपयांपर्यंत आहे. हा नवीन रिचार्ज प्लॅन युजर्सना अधिक चांगला अनुभव आणि जबरदस्त फायदे देणारा ठरणार आहे.
Airtel ने त्यांचा जुना 189 रुपयांचा ट्रूली अनलिमिटेड प्लॅन पूर्णपणे बंद केला आहे. हा रिचार्ज प्लॅन काही काळापूर्वी कंपनीच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर उपलब्ध होता. मात्र आता हा प्लॅन वेबसाईट आणि अॅपवरून हटवण्यात आला आहे. 189 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन अशा युजर्ससाठी बेस्ट ठरणार होता, ज्यांना व्हॉईस सर्विसचा जास्त वापर करायचा असतो. मात्र आता कंपनीने हाे सेगमेंट संपवून 199 रुपयांपासून प्लॅनची सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा की Airtel आता आपल्या यूजर्सना चांगले मूल्य आणि डिजिटल फायदे देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
Ans: 121 (ग्राहक सेवा), 198 (तक्रारींसाठी)
Ans: जवळच्या Airtel स्टोअरमध्ये ओळखपत्रासह भेट द्या आणि SIM पुनर्सक्रिय करण्याची विनंती करा.
Ans: होय, काही निवडक प्लॅन्समध्ये रात्रीच्या वेळी (12 AM ते 6 AM) अनलिमिटेड डेटा सुविधा दिली जाते.






