Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर

Teen Account Features: टीन अकाउंट्स हे मेटाच्या प्लॅटफॉर्मवर (इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर) एक खास वैशिष्ट्य आहे जे किशोरवयीन युजर्सना अधिक सुरक्षित अनुभव देते. या फीचरबद्दल अधिक जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2025 | 11:17 AM
16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर

16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर

Follow Us
Close
Follow Us:

मेटाने त्यांच्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फीचर जारी केलं आहे. या फीचरद्वारे आता 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पालकांचा कंट्रोल असणार आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि मॅसेंजरचा समावेश असणार आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीन अकाउंट्स फीचर आणलं आहे. यामुळे आता 16 वर्षांखालील मुलांच्या अकाऊंटवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन फीचर रिलीज

तरूणांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी मेटाने आता हे पाऊल उचललं आहे. हे फीचर प्रथम इंस्टाग्रामसाठी रिलीज करण्यात आलं होतं. मात्र आता कंपनीने त्यांच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी देखील हे फीचर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन फीचरमध्ये सुधारित गोपनीयता सेटिंग्ज आणि पालक नियंत्रणे समाविष्ट आहेत. यामुळे आता पालक मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

काय आहे कंपनीचा उद्देश

अलीकडे अमेरिकेत किड्स ऑनलाइन सेफ्टी अ‍ॅक्ट (KOSA) सारखे कायदे लागू करण्याची तयारी केली जात आहे. अशातच आता मेटाने हे नवीन फीचर आणलं आहे. या फीचरमुळे मुलांचे ऑनलाईन धोक्यांपासून संरक्षण व्हावं असा कंपनीचा उद्देश आहे. मेटाने म्हटले आहे की आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सना लाईव्ह जाण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय, जर डायरेक्ट मेसेजमध्ये कोणतेही नग्न चित्र आढळले तर कंपनी ते आपोआप अस्पष्ट करेल.

असं काम करणार नवीन फीचर

नवीन फीचर अंतर्गत, 16 वर्षांखालील सोशल मीडिया युजर्सना त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय लाईव्ह जाऊ शकणार नाहीत. याशिवाय, हे युजर्स त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय डायरेक्ट मेसेजेस (DM) मधील अनुचित फोटो आणि कंटेंट ब्लॉक करणारे फिल्टर देखील डिसेबल करू शकणार नाहीत. हे नवीन फीचर मेटाच्या टीन सेफ्टी फोरम दरम्यान सादर करण्यात आले आहे.

मेटा टीन सेफ्टी फोरम

या कार्यक्रमाला इंस्टाग्रामच्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी डायरेक्टर तारा हॉपकिन्स आणि लेखिका आणि स्तंभलेखिका ट्विंकल खन्ना उपस्थित होत्या. तारा हॉपकिन्स म्हणाल्या, “जगात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या भारतात आहे. जगभरातील 13 ते 15 वर्षे वयोगटातील 97% किशोरवयीन मुले या संरक्षणात्मक वातावरणात राहतात हे पाहून आम्हाला आनंद होत आहे.” ट्विंकल खन्ना म्हणाली, “इंस्टाग्राम टीन अकाउंट्स फीचरमुळे किशोरवयीन मुलांना त्यांचा स्वतःचा डिजिटल प्रवास आराखडा करता येईल आणि पालक खात्री करू शकतील की मुले कोणत्याही धमक्या किंवा स्पॅमला बळी पडणार नाहीत.”

प्रतिक्षा संपली! 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iQOO चे नवे स्मार्टफोन लाँच, 7,300mAh बॅटरी आणि असे आहेत स्पेशल फीचर्स

किशोरवयीन खाती म्हणजे काय?

टीन अकाउंट्स हे मेटाच्या प्लॅटफॉर्मवर (इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर) एक खास वैशिष्ट्य आहे जे किशोरवयीन युजर्सना अधिक सुरक्षित अनुभव देते आणि पालकांना त्यांच्या अकाऊंटचे निरीक्षण करण्याचे पर्याय देते. मेटाच्या मते, सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेले हे फीचर आतापर्यंत इंस्टाग्रामवर 54 दशलक्षाहून अधिक किशोरवयीन मुले वापरत आहेत.

Web Title: Teen account features is also released for facebook and messenger tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • instagram
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल
1

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat
2

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार
3

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?
4

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.