Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेलीकॉम सेक्टरमध्ये होणार मोठा बदल! या दोन कंपन्या एकत्र येण्याची शक्यता, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या हातमिळवणी करण्याची तयारी करत आहेत. या हातमिळवणीनंतर टेलिकॉम क्षेत्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. याचा फायदा यूजर्सना देखील होणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 12:59 PM
टेलीकॉम सेक्टरमध्ये होणार मोठा बदल! या दोन कंपन्या एकत्र येण्याची शक्यता, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

टेलीकॉम सेक्टरमध्ये होणार मोठा बदल! या दोन कंपन्या एकत्र येण्याची शक्यता, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • टेलिकॉम क्षेत्रात मोठी हालचाल! BSNL आणि Vi एकत्र येण्याची शक्यता, ग्राहकांना मोठा फायदा?
  • BSNL-Vi हातमिळवणीची चर्चा जोरात! नेटवर्क आणि ब्रॉडबँडमध्ये होऊ शकतो मोठा बदल
  • मोठी टेलिकॉम डील शक्य? BSNL आणि Vi एकत्र आल्यास ग्राहकांचा अनुभव बदलेल
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड आणि सतत तोट्यात असणारी टेलीकॉम कंपनी व्हिआय यांच्यामध्ये स्पेक्ट्रम शेयरिंग आणि फायबर कवरेजबाबत चर्चा सुरु आहे. बीएसएनएल आणि व्हिआय यांनी हातमिळवणी केल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. नेटवर्क कवरेजपासून ब्रॉडबँड कनेक्टिविटीपर्यंत ग्राहकांचा अनुभव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगला होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

बीएसएनएल आणि व्हिआय यांच्यामध्ये सुरु झाली चर्चा

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारत संचार निगम लिमिटेड आणि वोडाफोन-आइडिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या या चर्चेची माहिती दूरसंचार विभागाने एका संसदीय समितीला दिली आहे. प्रतिस्पर्ध्यांची वाढती संख्या आणि सतत कमी होणारे यूजर्स यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. सध्या, भारतात जिओ आणि एअरटेल या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडे अनुक्रमे 48 करोड आणि 43 करोडहून अधिक यूजर्स आहेत. तर बीएसएनएल आणि व्हिआय या टेलिकॉम कंपन्यांच्या यूजर्सची संख्या सतत कमी होत आहे. खराब नेटवर्क, रिचार्ज प्लॅनची वाढती किंमत यांसारख्या कारणांमुळे यूजर्स बीएसएनएल आणि व्हिआय सोडून जिओ आणि एअरटेलचे सिमकार्ड खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

संसदीय समितीने काय सांगितलं?

16 मार्च रोजी लोकसभेच्या वेबसाईटवर एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये संचार सचिव समित अग्रवाल यांनी संसदीय समितिला सांगितलं आहे की, Vi आणि BSNL यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, हे विलीनीकरण शक्य होईल की नाही, हे पुढील चर्चेनंतरच ठरवले जाईल. दरम्यान, गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील संचार आणि माहिती तंत्रज्ञान संसदीय समितीने, दोन्ही ऑपरेटर्समधील पायाभूत सुविधांच्या वाटपाबाबत निर्णय घेण्यास मदत करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाला दिले आहेत.

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

2016 मध्ये जिओ नेटवर्क सुरु करण्यात आले. अगदी कमी वेळातच जिओने बाजी मारली आणि देशातील टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले. यावेळी अनेक टेलिकॉम कंपन्या बंद देखील झाला. याच काळात वोडाफोन आणि आइडिया यांनी एकत्र येत Vi ची स्थापना केली. या हातमिळवणीनंतर Vi देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली होती. मात्र काही महिन्यांतच जियो आणि एयरटेल ने Vi ला मागे सोडलं. यानंतर टेलिकॉम क्षेत्र पूर्णपणे बदललं. सततच्या एजीआर थकबाकीमुळे व्होडाफोन आयडिया दबावाखाली होती, ज्यामुळे तिच्या नेटवर्क विस्तारास विलंब झाला. 5G स्पेक्ट्रम मिळवूनही, ते सुरू करण्यासाठी तीन वर्षे लागली.

Web Title: These two telecom companies will merge soon users get benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • bsnl
  • telecom company
  • Vodafone

संबंधित बातम्या

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
1

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
2

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.