फोनमध्ये गेलं पावसाचं पाणी? थांबा! तुमच्या या चुका ठरतील Dangerous, डिव्हाईस होऊ शकतं खराब
भारतातील अनेक राज्यांत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये तर पावसाची संततधार कायम आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय पावसामुळे वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. पावसामध्ये आपल्या मनातील भिती म्हणजे स्मार्टफोन पावसात भिजू नये.
या देशात लवकरच बॅन होणार लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम, काय आहे कारण? जाणून घ्या
जर आपला स्मार्टफोन पावसात भिजला तर तो खराब होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत लोकं पॅनिक होतात आणि त्यांना काय करावं हेच सूचतं नाही. स्मार्टफोनमध्ये पावसाचं पाणी गेलं आणि अशा परस्थितीत घाबरून तुम्ही काही चुका केल्या तर स्मार्टफोनचा स्फोट होऊ शकतो. शिवाय तुमच्या जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. जर स्मार्टफोन पाण्यात भिजला किंवा फोनमध्ये पावसाचं पाणी गेलं तर घाबरून जाण्याची गरज नाही. फोनमध्ये पावसाचं पाणी गेल्यानंतर सर्वात आधी फोन बंद करा आणि खालील चुका करणं टाळा. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन पावसात भिजल्यानंतर फोन चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी लोकं फोन ऑन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यानंतर तो चालू करण्याचा प्रयत्न केल्यास शॉर्ट सर्किट होण्याची देखील शक्यता असते. यामुळे फोन खराब होऊ शकतो. त्यामुळे फोन पाण्यात पडला असेल किंवा फोनमध्ये पाणी गेल्यास तो ऑन करण्याचा प्रयत्न करू नका.
अनेक लोकं असे असतात जे पावसात फोन भिजल्यानंतर लगेच चार्जिंगला लावतात, ज्यामुळे फोन लवकर चालू होईल असं त्यांना वाटतं. पण यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. चार्जिंग दरम्यान पाणी आणि करंट यांचा संबंध आल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं. तुमचा महागडा फोन खराब होऊ शकतं.
पावसात फोन ओला झाल्यानंतर बरेच लोकं तो हेयर ड्रायर किंवा हीटरने वाळण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणं धोकादाक ठरू शकतं. हेयर ड्रायर किंवा हीटरमुळे निर्माण होणाऱ्या हीटने स्मार्टफोनच्या अंतर्गत भागांना नुकसान पोहोचू शकते. यामुळे फोनमधील सेंसिटिव कंपोनेंट्स वितळू शकतात. स्क्रीन आणि बॅटरीला देखील नुकसान पोहोचू शकतं.
फोनमध्ये पाणी गेल्यानंतर लोकं त्या फोनला हलवतात आणि त्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे फोनच्या एका भागातील पाणी दुसऱ्या भागात जातं. याचा परिणाम स्मार्टफोनच्या स्पीकर, मायक्रोफोन आणि चार्जिंग पोर्टवर होतो.
समोर आली Hacking Ranking! टॉप 10 देशांमध्ये भारताचा समावेश, हा देश आहे पहिल्या क्रमांकावर
फोन पावसात ओला झाल्यानंतर तो तांदळाच्या डब्यात ठेवल्याने फोन लवकर सुकतो, अस अनेकांचं मत आहे. पण असं नाही. फोन तांदळाच्या डब्यात ठेवल्याने ओलावा पूर्णपणे निघून जात नाही. याशिवाय चार्जिंग पोर्टमध्ये तांदूळ अडकण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे फोन तांदळ्याच्या डब्यात न ठेवण्याचा सल्ला तर अनेक मोबाईल कंपन्या देखील देतात.