
Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या
Free Fire मध्ये Groza सर्वाधिक दमदार असॉल्ट राइफलपैकी एक मानली जाते. यामध्ये जास्त डॅमेज, अधिक चांगली रेंज आणि अत्यंत स्टेबल एक्यूरेसी मिळते. या गन्सच्या मदतीने प्लेअर्स दिर्घकाळ गेममध्ये टिकू शकतात आणि त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. ही गन लूटमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला जवळून तुमच्या शत्रूंवर हल्ला करणं अधिक आवडत असेल तर तुम्ही MP40 ची निवड करू शकतात. याची जबरदस्त फायरिंग स्पीड समोरील व्यक्तीला अगदी काही क्षणातच संपवते. या बंदूकीची रेंज कमी आहे, मात्र जवळून हल्ला केल्यास तुमच्या शत्रूचा क्षणातच खात्मा होऊ शकतो. मैदानावर पूर्णपणे वर्चस्व गाजवू इच्छिणाऱ्या आक्रमक खेळाडूंसाठी ही बंदूक एक आवडते शस्त्र बनते.
जर तुम्हाला दुरून तुमच्या शत्रूंवर हल्ला करायला आवडत असेल तर AWM पेक्षा जबरदस्त कोणीच नाही. हे स्नाइपर राइफल एक शॉटमध्ये सर्वाधिक डॅमेज देते. जर तुम्ही योग्य निशाणा लावला तर क्षणातच तुमचा शत्रू गेममधून बाहेर जाऊ शकतो. ज्यांना गपचूप आण लांबून खेळायला आवडतं, त्यांच्यासाठी ही गन बेस्ट आहे.
जर तुम्हावा शॉटगन गेमप्ले आवडत असेल तर M1887 कोणत्याही पावरहाउसपेक्षा कमी नाही. याच्या एक दोन गोळ्यांनीच शत्रूचा मृत्यू होऊ शकतो. ही बंदूक क्लोज-रेंज फाइटसाठी एक उत्तम शस्त्रं मानले जाते.
जर तुम्हाला अशी एखादी बंदूक पाहिजे असेल जी प्रत्येक प्रकारतच्या लढाईत तुम्हाला मदत करेल तर तुम्ही SCAR ची निवड करू शकता. हे असॉल्ट राइफल डॅमेज, एक्यूरेसी आणि स्टेबिलिटीचा उत्तम बॅलेन्स दर्शवते. ही बंदूक नवीन आणि प्रो दोन्ही खेळाडूंना आवडते.