आता किचनमध्येही लागणार स्मार्टफोनचा तडका! EGGS फ्रेश आहे की नाही? न फोडताच समजणार, नव्या तंत्रज्ञानाची यूजर्सना भूरळ
Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
फ्रेश आणि खराब अंड ओळण्याची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत म्हणजे टॉर्च किंवा स्मार्टफोनच्या फ्लॅशलाईटचा वापर करणं. यासाठी तुम्हाला एका काळोख्या खोलीची गरज असणार आहे. अंड ताजे आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक अंधाऱ्या खोलीत मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करून एका टेबलवर ठेवा. आता अंड फ्लॅशवर ठेवा. जर अंड फ्रेश असेल तर त्यामध्ये तुम्हाला हलका पिवळा किंवा नारंगी उजेड दिसेल. पण जर अंड काळ किंवा त्याच्या आत एक गडद ठिपका किंवा ढगाळ भाग दिसत असेल तर समजा अंड खराब आहे. तसेच अंड खराब असेल तर तुम्हाला त्यामध्ये केवळ अंधार देखील दिसू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्ले स्टोअरवर ‘Egg Freshness Tester’ किंवा ‘Candling Eggs’ सारखे काही अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही अंड ताजे आहे की नाही ओळखू शकता. या अॅप्समध्ये तुम्हाला अंड्याबाबत काही माहिती दिली जाईल, जसे खरेदीची तारीख इत्यादी माहिती. तसेच या अॅप्समध्ये तुम्हाला अंड स्कॅन करण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे. काही अॅडव्हांस अॅप्स फोनचा कॅमेरा आणि सेंसरचा वापर करून अंड्याच्या आतील स्थिती देखील सांगतात. ही माहिती 100 टक्के खरी असेल असं नाही. अॅप्सच्या मदतीने तुम्हाला एक अंदाज मिळू शकतो.
स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही अगदी सहज फ्रेश आणि खराब अंड ओळखू शकता. यासाठी अंड टॉर्चसमोर ठेऊन व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा. यानंतर अंड हळू- हळू फिरवा. आता रेकॉर्ड केलेला व्हिडीओ स्लो मोशनमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला समजेल अंड खराब आहे की नाही. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला अंड्यातील द्रव भाग कोणत्याही डागांशिवाय किंवा काळोखाशिवाय हालचाल करताना दिसत असेल, तर याचा अर्थ असा की अंडे ताजे आहे. त्याच वेळी, जर व्हिडिओमध्ये अंड्याच्या आत हवेचा एक मोठा फुगा दिसत असेल किंवा जास्त गडद भाग असेल तर समजून घ्या की अंडे जुने आहे किंवा खराब आहे. तुम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि फ्लॅशलाईटचा वापर करून अधिक चांगले रिझल्ट मिळवू शकता. तर अॅपचा वापर करून अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
Ans:
Ans:
Ans:






