Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
Samsung चा Galaxy S25 Ultra हा स्मार्टफोन यावर्षी प्रचंड चर्चेत होता. हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर चालतो आणि डिव्हाईस Android 15 OS सह लाँच करण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, S25 Ultra ला 7 मोठे सॉफ्टवेयर अपडेट मिळणार आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनध्ये 200MP चा प्राइमरी शूटर आहे, जो OIS सपोर्टसह येतो. क्वाड कॅमेरा सिस्टम याला फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंगसाठी एक आदर्श स्मार्टफोन बनवतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने 2025 मध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये iPhone 17 Pro Max लाँच केला आहे. हा आयफोन 1,49,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. यामध्ये 6.9 इंच Super Retina XDR OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. यामध्ये Apple A19 Pro चिपसेट आहे, जो 3nm प्रोसेसवक आधारित आहे. कॅमेरा सेटअपमध्ये तीन 48MP सेंसर दिले आहे, ज्यामध्ये प्राइमरी, टेलीफोटो आणि अल्ट्रा-वाइड समाविष्ट आहे. 17 Pro Max व्हिडीओ रेकॉर्डिंग, प्रो लेव्हल फोटोग्राफी, बॅटरी ऑप्टिमाइजेशन आणि दिर्घकाळ सॉफ्टवेयर सपोर्टसाठी चर्चेत आहे.
गुगलचा हा स्मार्टफोन तब्बल 1,79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. यामध्ये 8 इंच फोल्डेबल LTPO OLED डिस्प्ले आहे. यासोबतच यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट दिला आहे. कवर स्क्रीन 6.4 इंच आहे आणि हे डिव्हाईस Android 16 वर चालते. गुगलने ७ वर्षांचे अपग्रेड देण्याचा दावा केला आहे. हा फोन Google Tensor G5 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि फोन AI-आधारित फोटोग्राफी, मॅजिक एडिट फीचर्स आणि प्रीमियम मल्टीटास्किंग साठी उत्तम आहे.
Oppo ने यावर्षी Find X9 Pro लाँच करून प्रिमियम सेगमेंट आणखी मजबूत बनवले. याची किंमत 1,09,999 रुपये आहे. यास्मार्टफोनमध्ये 6.78 इंच LTPO AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिव्हाईस MediaTek Dimensity 9500 चिपसेटवर आधारित आहे, ज्यामध्ये ARM G1-Ultra GPU दिला आहे. या स्मार्टफोनचा 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा याची सर्वात मोठी खासियत आहे.
Vivo X300 Pro फोटोग्राफी लवर्ससाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 1,09,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्राइमरी कॅमेरा समाविष्ट आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9500 चिपसेट आहे आणि हा फोन Android 16 OS वर चालतो, ज्यामध्ये 5 मोठे अपग्रेड देण्याचा दावा करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 6510mAh बॅटरीसह 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.






