Share Market Today: आज शेअर बाजारात उंच भरारीची चिन्हं, गुंतवणूकदारांसाठी ‘हे’ शेअर्स ठरतील गेमचेंजर!
जागतिक बाजारातील मिश्र संकेत आणि गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड यांनी दिलेल्या संकेतांचा विचार करता आज १५ ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२८७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ८१ अंकांनी जास्त होता.
मंगळवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,२०० च्या पातळीच्या खाली घसरला. सेन्सेक्स २९७.०७ अंकांनी म्हणजेच ०.३६% ने घसरून ८२,०२९.९८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ८१.८५ अंकांनी म्हणजेच ०.३२% ने घसरून २५,१४५.५० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १२८.५५ अंकांनी किंवा ०.२३% ने घसरून ५६,४९६.४५ वर बंद झाला. त्यामुळे काल झालेल्या नुकासानानंतर आज शेअर बाजारातील परिस्थिती कशी असणार, याबाबत गुंतणूकदार चिंतेत होते. मात्र तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी , टाटा मोटर्स आणि स्विगी यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार अॅक्सिस बँक, आयआरएफसी, टाटा कम्युनिकेशन्स, एचडीएफसी लाईफ, टेक महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक, आयसीआयसीआय लोम्बार्ड, मिश्रा धातु निगम, मारुती सुझुकी, सुला व्हाइनयार्ड्स, वेदांत, कीस्टोन रिअल्टर्स, ह्युंदाई मोटर इंडिया या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये उषा मार्टिन, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस, ग्रॅन्युल्स इंडिया, प्रीमियर एनर्जीज आणि स्विगी यांचा समावेश आहे.
बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी ४० हून अधिक कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत . बीएसई निकालांच्या कॅलेंडरनुसार, या आठवड्यात २०० हून अधिक कंपन्या त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. आज त्यांचे उत्पन्न जाहीर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, एल अँड टी फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश आहे .