19 वर्षांपूर्वी झाली Twitter ची स्थापना! Elon Musk ने तयार केला X, कसा होता हा प्रवास? जाणून घ्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर म्हणजेच आत्ताचे एक्स, 19 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते. मार्च 15 जुलै 2006 रोजी जॅक डोर्सी, नोआ ग्लास, बिज स्टोन आणि इवान विलियम्सने ट्विटर लाँच केले होते. मात्र 27 ऑक्टोबर 2022 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक असलेल्या एलन मस्कने 27 ऑक्टोबर, 2022 रोजी ट्विटरची खरेदी केली. आज 15 जुलै रोजी ट्विटरच्या लाँचिंगला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. जरी सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर एक्स नावाने ओळखलं जात असलं तरी देखील सोशल मीडिया युजर्सच्या मनात ट्विटरच्या आठवणी आजही तशाच आहेत.
2006 मध्ये जेव्हा जॅक डोर्सी, नोआ ग्लास, बिज स्टोन आणि इवान विलियम्सने ट्विटरची स्थापना केली होती, त्यावेळी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांसोबत ट्विट शेअर केले होते. यावेळी त्याची स्पेलिंग twttr.com अशी होती. मात्र तब्बल 6 महिन्याच्या प्रचंड मेहनतीनंतर ही स्पेलिंग twitter.com अशी करण्यात आली. अशा प्रकारे झाली होती ट्विटरची सुरुवात. 16 वर्ष हा प्रवास असाच सुरु होता. कंपनीने अनेक नवीन युजर्स जोडले. (फोटो सौजन्य – Pinterest)
ट्विटर एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रेडप्रमाणेच ट्विटरचा वापर केला जाऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही जगभरातील विविध व्यक्तिंना फॉलो करू शकता आणि त्यांनी शेअर केलेले ट्विट वाचू शकता. अगदी कमी काळात ट्विटरने फार मोठे यश गाठले. ट्विटरवर ज्या पोस्ट शेअर केल्या जातात त्याला ट्विट म्हटलं जातं. ट्विटरच्या मदतीने तुम्ही देशात आणि जगात दररोज सर्वाधिक चर्चेत असलेल्या सर्व विषयांबद्दल जाणून घेऊ शकता आणि त्या विषयांवर तुमचे मत देखील देऊ शकता. ट्विटरचे मुख्य कार्य म्हणजे लोकांना कोणत्याही मुद्द्यावर त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी मुभा देणे. तुमच्या मनात जे आहे, तुम्हाला एखाद्या विषयावर तुमचे मत मांडायचे असेल तुम्ही याबाबत ट्विटरवर पोस्ट शेअर करू शकता.
ट्विटरने त्यांच्या युजर्ससाठी अनेक फीचर्स देखील लाँच केले होते, ज्यामुळे युजर्सना ट्विट करण्यात आणि पोस्ट करण्यात आणखी चांगला अनुभव येत होता. हा प्रवास सुरु असतानाच 2022 मध्ये एलन मस्कने ट्विटरची खरेदी केली आणि या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नाव बदलून एक्स करण्यात आलं. ट्विटरच्या या 16 वर्षांच्या प्रवासात अनेक गोष्टी घडल्या. नवे युजर्स जोडले गेले, काही युजर्स सोडून गेले तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टॉप अॅप्सपैकी एक होता.
ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरवर पहिले ट्विट शेअर केले होते. 22 मार्च 2006 रोजी हे पहिले ट्विट शेअर करण्यात आले होते. जॅक डोर्सी यांनी शेअर केलेले पहिले ट्विट अजूनही ट्विटरवर उपलब्ध आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:20 वाजता जॅक डोर्सी यांनी हे ट्विट केले होते, परंतु आता हे ट्विट विकले गेले आहे. 2006 मध्ये केलेल्या या ट्विटमध्ये ट्विटरच्या लाँचची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या ट्विटमध्ये लिहीले होते की, ‘जस्ट सेट अप माय ट्विटर’. नैना रेडू ही भारतातील पहिली ट्विटर युजर आहे. 2006 मध्ये ऑर्कुटच्या काळात ती ट्विटरमध्ये सामील झाली होती. त्यावेळी ट्विटरचे कोड नेम TWTTR होते. नैना आता राजस्थानातील जैसलमेर येथील एका हॉटेलमध्ये काम करते.