Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

UIDAI Bug Bounty Program: आधार कार्ड वापरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आधार कार्डची सुरक्षा वाढावी यासाठी UIDAI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. एक नवीन प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 11:25 AM
आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

Follow Us
Follow Us:
  • आधार कार्ड आता आणखी सुरक्षित! UIDAI ने सुरू केला नवा खास प्रोग्राम
  • UIDAI चा मोठा निर्णय! आधार कार्ड सुरक्षेसाठी सुरू झाला विशेष उपक्रम
  • आधारधारकांसाठी मोठी अपडेट! UIDAI ने एक्सवर दिली महत्त्वाची माहिती
आधार कार्ड सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. खाजगी कामांपासून सरकारी कामांपर्यंत सर्व ठिकाणी आपल्याला आधार कार्डची गरज असते. अत्यंत महत्त्वाचे असणारे डॉक्यूमेंट आधार कार्ड सुरक्षित असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुमचे आधार कार्ड सुरक्षित नसेल आणि एखाच्या चुकीच्या व्यक्तिच्या हातात पडले तर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. याच सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आता UIDAI ने आधार कार्डची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. UIDAI ने आधार कार्डच्या सुरक्षेसाठी एक नवीन प्रोग्राम सुरु केला आहे.

Xiaomi च्या नव्या 4K स्मार्ट टिव्हीची जबरदस्त एंट्री! 50-इंच स्क्रीन आणि 144Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज, किंमत तुमच्या बजेटमध्ये

UIDAI चा हा प्रोग्राम आधार कार्डची सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. UIDAI चा हा बिग बाउंटी प्रोग्राम आधार कार्डची सायबर सिक्योरिटी अधिक मजबूत व्हावी यासाठी सुरु करण्यात आला आहे. यामध्ये अनुभवी साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट्स, एथिकल हॅकर्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

यूआईडीएआई ने आधार प्रणाली की सुरक्षा को और मजबूत करने के लिए अपना पहला संरचित बग बाउंटी कार्यक्रम शुरू किया है। अधिक जानकारी के लिए: https://t.co/I72NMK8Vf8 pic.twitter.com/eZ0kPaRMnM — Aadhaar (@UIDAI) March 13, 2026

काय आहे बग बाऊंटी प्रोग्राम?

UIDAI ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नवीन प्रोग्रामबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, आधार कार्डची सुरक्षा आणखी मजबूत व्हावी यासाठी बग बाउंटी प्रोग्राम लाँच करण्यात आला आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी अनुभवी सायबर रिसर्च एक्सपर्ट्स आणि एथिकल हॅकर्सचा एक पॅनल तयार करण्यात आला आहे. हे सायबर सुरक्षा तज्ञ UIDAI च्या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्ममधील संभाव्य त्रुटी ओळखण्याचा प्रयत्न करणार आहेत.

बग बाउंटी प्रोग्रामच्या पॅनलमधील एक्सपर्ट्सना कोणत्याही वास्तविक सिक्योरिटीमध्ये एखादी त्रुटी आढळली आणि त्यांनी या त्रुटीबाबत रिपोर्ट केले तर त्यांना समस्येच्या गंभीरतेच्या आधारावर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. UIDAI ने सांगितलं आहे की, आधार प्रणाली आणि प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व मजबूत बनवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत… हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

अलीकडेच लाँच केले होते नवीन अ‍ॅप

बग बाउंटी प्रोग्राम सुरु करण्यापूर्वी UIDAI ने अलीकडेच एक नवीन आधार अ‍ॅप लाँच केला होता. यामध्ये यूजर्सना अनेक सुविधा ऑफर केल्या जात होत्या. यूजर्स घरबसल्या त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी अ‍ॅपचा वापर करू शकत होते. यासाठी त्यांना आधार कार्ड सेंटरवर देखील जाण्याची गरज नाही. नवीन आधार ॲप यूजर्सचे आधार कार्ड सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक लॉक आणि डिटेल्स लपवण्याचे पर्याय देखील देते. कार्डधारक आपला आधार क्रमांक शेअर न करता क्यूआर कोडद्वारे कागदविरहित डॉक्यूमेंट वेरिफिकेशन देखील करू शकतात.

Web Title: Uidai starts new bug bounty program to increase aadhaar card security know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Aadhaar
  • Tech News
  • UIDAI

संबंधित बातम्या

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
1

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
2

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
3

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.