
Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या या मशीनमध्ये तेल, चिकटपणा आणि अन्नाचे छोटे कण जमा होतात. हे सर्व योग्य पद्धतीने साफ केले नाही तर मशीनच्या हीटिंग सिस्टम, वेंट्स आणि नॉन-स्टिक कोटिंगला नुकसान पोहोचू शकते. यामुळे एयर फ्रायरची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
एअर फ्रायरची मुख्य बॉडी पाण्यात बुडवू नका. कारण यामध्ये इलेक्ट्रॉनिक घटक असतात. त्यामुळे एअर फ्रायरचा मुख्य भाग हलक्या ओल्या कापडाने किंवा कापसाने स्वच्छ करा. कंट्रोल पॅनलवर ओलावा येऊ देऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच, स्वच्छता करण्यापूर्वी प्लग काढा.
एअर फ्रायरची स्वच्छता न करता त्याचा वारंवार वापर केल्याने त्यावर चिकटपणा आणि अन्नाचे कण जमा होऊ शकतात. यामुळे जेवण बनवताना दुर्गंध येऊ शकतो आणि एअर फ्रायरमधील आधीपासूनच शिल्लक तेलामुळे जेवण खराब होऊ शकते. यामुळे प्रत्येकवेळी वापरानंतर बास्केट आणि ट्रे व्यवस्थित स्वच्छ करा.
बास्केट किंवा ट्रे स्वच्छ करण्यासाठी स्टील वूल, मेटल स्क्रबर किंवा जास्त खरखरीत स्पंज वापरू नका. यामुळे नॉन-स्टिक कोटिंग खराब होण्याची शक्यता असते. बास्केट किंवा ट्रे स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट स्पंज, हलका डिश सोप आणि कोमट पाण्याचा वापर करणं योग्य ठरू शकते. एखाद्या ठिकाणी जास्त चिकटपणा असेल तर तो भाग काहीवेळ भिजवून त्यानंतर स्वच्छ केला जाऊ शकतो.
एअर फ्रायरच्या हीटिंग एलिमेंटवर देखील अन्नाचे कण आणि चिकटपणा जमा होऊ शकतो. त्यामुळे हीटिंग एलिमेंट पूर्णपणे थंड करून आणि प्लग काढून सॉफ्ट ब्रश किंवा टूथब्रशने त्याची स्वच्छता केली जाऊ शकते. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास एयर फ्रायरच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
ब्लीच, ओवन क्लीनर किंवा दुसऱ्या दूसरे कठीण केमिकल नॉन-स्टिक कोटिंगला नुकसान पोहोचवू शकते. याऐवजी हलका डिश सोप आणि कोमट पाणी वापरून स्वच्छता करू शकता.