Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

'Vi' ने आज आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट आणली आहे. आता परदेश प्रवासात कोणतीही अतिरिक्त फी न देता 'वी' ग्राहकांना निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 02:57 PM
रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Follow Us
Follow Us:
  • वी ग्राहकांना प्रमुख पोस्टपेड, प्रीपेड आणि एंटरप्राइज प्लॅन्सवर 170 हून अधिक देशांत मोफत इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा मिळणार आहे.
  • पात्र ग्राहकांना वर्षभरात तीन परदेश प्रवासांपर्यंत फ्री रोमिंगचा लाभ मिळणार असून, यामुळे वर्षाला ₹9,000 पर्यंत बचत होऊ शकते.
  • Vi App मधील ‘इंटरनेशनल रोम-फ्री प्लॅन’ पर्यायातून ही सुविधा वापरता येणार असून, यामध्ये डेटा आणि आउटगोइंग कॉलिंगचे फायदे प्लॅननुसार मिळतील.
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘वी’ ने आज आपल्या ग्राहकांसाठी एका मोठ्या सुविधेची घोषणा केली आहे. ‘वी पे हैं सब वीआईपी’ या आपल्या नवीन ब्रँड वचनाला अनुसरून कंपनीने ग्राहकांसाठी एक खास भेट आणली आहे. आता परदेश प्रवासात कोणतीही अतिरिक्त फी न देता ‘वी’ ग्राहकांना निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा कंपनीच्या प्रमुख पोस्टपेड, प्रीपेड आणि एंटरप्राइज प्लॅन्सवर उपलब्ध आहे. कंपनीने केलेल्या या मोठ्या घोषणेमुळे आता १७० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करत असताना ‘वी’ ग्राहक आणि त्यांचे कुटुंबीय सहज व पूर्णपणे निःशुल्क एकमेकांच्या संपर्कात राहू शकणार आहेत.

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून परदेश प्रवासात मोबाईल कनेक्टिव्हिटी चालू ठेवणं एक आव्हान ठरते. अशावेळी परदेश प्रवासात प्रवाशांना एकापेक्षा जास्त सिम कार्ड्स बाळगणे, प्रवासाला निघण्यापूर्वी स्थानिक किंवा ट्रॅव्हल सिम खरेदी करणे, आपला मूळ भारतीय मोबाईल नंबर वापरण्याची सोय गमावणे, महत्त्वाचे बँक किंवा लॉगिन ओटीपी न मिळणे, असुरक्षित सार्वजनिक वाय-फायवर अवलंबून राहणे, कागदपत्रांची कटकट किंवा अवाढव्य रोमिंग बिलांची चिंता यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. प्रवाशांची हीच समस्या लक्षात घेऊन वी ने आता एक महत्त्वापूर्ण घोषणा केली आहे.

‘वी’ आता या संपूर्ण अनुभवात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. वी आपल्या ग्राहकांसाठी परदेश प्रवास अतिशय सोपा व सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘वी’ने त्यांच्या प्लॅन्समध्येच ‘निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंग’ समाविष्ट केले आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता परदेशातील कनेक्टिविटी अत्यंत सोपी, सर्वसमावेशक, विनाव्यत्यय आणि चिंतामुक्त झाली आहे. अभिनेता शाहरुख खान यांचा सहभाग असलेल्या एका नवीन टीव्ही जाहिरातीच्या माध्यमातून ही संकल्पना प्रेक्षकांसमोर आणली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टपेड, प्रीपेड आणि एंटरप्राइज ग्राहकांना आता वर्षभरात ३ परदेश प्रवासांपर्यंत मोफत इंटरनॅशनल रोमिंगचा फायदा मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय डेटा मर्यादा आणि आऊटगोइंग कॉलिंग मिनिट्सचा समावेश असणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहक वर्षाला तब्बल ९,००० रुपयांपर्यंत बचत करू शकणार आहेत.

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

‘वी ॲप’ सुरू करून ‘इंटरनॅशनल रोम-फ्री प्लॅन्स’ निवडल्यानंतर ग्राहकांना परदेश प्रवासात मोफत आंतरराष्ट्रीय कनेक्टिविटीचा आनंद घेता येणार आहे. या नवीन सुविधेअंतर्गत, पात्र प्लॅन्स वापरणाऱ्या ग्राहकांना निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंगसह इतर अनेक फायद्यांचा आनंद घेता येईल. यामध्ये ₹५०१ पासून सुरू होणारे पोस्टपेड प्लॅन्स, वार्षिक प्रीपेड अनलिमिटेड डेटा प्लॅन्स आणि एंटरप्राइज ग्राहकांसाठी ₹४५१ पासून सुरू होणाऱ्या कॉर्पोरेट प्लॅन्सचा समावेश आहे.

Web Title: Vi started free international roaming 170 countries postpaid prepaid enterprise plans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
1

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
4

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.