
Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा... 'या' जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली जिओ त्यांच्या यूजर्सना 2,025 रुपयांचा एक लाँग-टर्म प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना 200 दिवसांच्या व्हॅलिटीडीसह इतर अनेक फायदे मिळतात. व्हॉईस कॉलिंग आणि डेली एसएमएससह यामध्ये भरपूर डेटा देखील मिळतो. ज्यामुळे तुम्ही गेमिंग, स्क्रोलिंग करू शकता. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 2,025 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 200 दिवसांची आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. डेली डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps पर्यंत होणार आहे. पात्र यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.
इतकंच नाही, या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोबाईल+ हॉलीवूड सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्सना ओटीटी कंटेट पाहण्यासाठी वेगळे सब्सक्रिप्शन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय, जिओ या प्लॅनसोबत एआय यूजर्ससाठी देखील खास ऑफर घेऊन आला आहे.
जिओच्या 2,025 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये गूगल जेनिमीचा प्रो प्लॅन 18 महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरची किंमत 35,100 रुपये आहे. यासोबतच, यूजर्सना 5,000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना सारखे AI फीचर्स देखील मिळणार आहे.
इतकंच नाही, या सर्व फायद्यांसोबत यूजर्सना जिओएआयक्लाऊडचे 50GB फ्री स्टोरेज देखील ऑफर केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, यूजर्सना 12 महिन्यांसाठी कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 1,590 रुपये आहे. त्यामुळे जर तुम्ही जिओचा दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह भरपूर फायदे ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 2,025 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. या प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि दिर्घकाळ व्हॅलिडीटीच नाही तर इतर अनेक दमदार फायदे ऑफर केले जाणार आहेत.