AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत
तुम्ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला AI टीचर्सचा व्हिडीओ पाहिला आहे का? फक्त AI टीचर्सच नाही तर AI न्यूज अँकर्स आणि AI रोबोट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण तुम्ही कधी AI शेफ बद्दल ऐकलं आहे का किंवा विचार केला आहे का जर एखादा AI शेफ असेल तर तो कशा प्रकारे जेवण बनवू शकतो? अनेक लोकांनी केलेली ही कल्पना आता सत्यात उतरली आहे. दुबईत जगातील पहिल्या AI शेफची निर्मिती करण्यात आली आहे.
जगातील पहिल्या AI शेफचं नाव Aiman आहे. आता शिक्षण, टिव्ही, यासर्वासोबतच जेवणाच्या जगात देखील अनोखी क्रांती घडणार आहे. UAE ची स्टार्टअप कंपनी UMAI ने जगातील पहिला AI शेफ Aiman ची निर्मिती केली आहे. दुबईच्या प्रसिद्ध Burj Khalifa जवळ Kempinski The Boulevard हॉटेलमध्ये लवकरच नवं रेस्टोरेंट WOOHOO सुरु केलं जाणार आहे. AI शेफ त्या रेस्टोरेंटचा एक भाग असणार आहे. हा प्रोजेक्ट Gastronaut नावाच्या कंपनीद्वारे तयार केला जात आहे. (फोटो सौजन्य – instagram)
Aiman कोणताही रोबोट नाही जो शेफची टोपी घालून जेवण बनवायला सुरुवात करेल. हा एक डिजिटल AI शेफ आहे जो मानवी शेफ्ससह काम करणार आहे. याचा उद्देश शेफची जागा घेणं नाही तर त्यांची मदत करणं आहे. UMAI च्या टीमने याला “culinary co-pilot” असं नाव दिलं आहे. म्हणजेच एक डिजिटल साथीदार जो तुम्हाला जेवण बनवण्याासाठी मदत करतो
शेफ Aiman मुळे WOOHOO रेस्टोरेंटचा मेन्यू फार मनोरंजक असणार आहे. यामध्ये जापानी, मॅक्सिकन आणि पेरुवियन खाद्यपदापर्थांचा समावेश असणार आहे. खाद्यपदार्थांच्या या प्रकारांमुळे जेवणाला एक अनोखी चव येणार आहे. पण या पदार्थांना एकत्र करून एक स्वादिष्ट जेवण बनवणे हे आयमनसाठी एक मोठे आव्हान असेल.
केवळ जेवणच नाही तर रेस्टॉरंटचे वातावरणही खास बनवण्यात आले आहे. तुमच्या जेवणाच्या अनुभवाला पुढील स्तरावर नेणाऱ्या तंत्रज्ञान आणि चवीचे अनोखे मिश्रण सुनिश्चित करण्यासाठी हे डिजिटल आर्ट, मेटॅलिक इंटीरियर, खास लाइटिंग आणि आश्चर्यकारक दृश्यांनी सुसज्ज आहे.
अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस
सेफ्टी आणि एथिक्स याबाबत देखील पुर्ण काळजी घेतली जाणार आहे. Aiman ज्या रेसिपीजवर काम करत आहे त्या रेसिपी पूर्ण रेकॉर्डमध्ये ठेवल्या जातात आणि रिअल-टाइम फीडबॅकसह चाचणी केल्या जातात. ग्राहकांना पूर्णपणे सुरक्षित आणि चविष्ट अन्न मिळावे हे सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे, मग तो स्वयंपाकी मानवी असो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). WOOHOO मध्ये बुकिंग सुरू झाले आहे आणि लोक या अनोख्या अनुभवाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. जर तुम्ही दुबईला जाण्याचा विचार करत असाल तर WOOHOO ला भेटायला आणि Aiman ला भेटायला विसरू नका.